तुळजापुर शहरातील भारतीय स्टेट बॅकेच्या पाठीमागे शॉर्टसर्किटमुळे घरगुतीचा गॅसचा स्फोट
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;मोठी जिवीत हाणी टळली मात्र लाखो रुपयांचे नुकसान
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापुर शहरातील पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भारतीय स्टेट बॅकेच्या पाठीमागे अंडे विक्री करणारे सलीम करीम सय्यद आणि त्यांच्या शेजारचे चार घरांमध्ये आज पसरली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून त्यामधून दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि घरामध्ये अन्य असणाऱ्या सिलेंडरचा देखील पाठोपाठ स्फोट झालेला आहे.
आजूबाजूच्या लोकांनी यादरम्यान मदत कार्य केले परंतु स्फोट झाल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे यामध्ये सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अन्य लोकांनी मदत कार्य केले आहे. बाजूला पोलीस स्टेशन होते परंतु अचानकपणे झालेल्या स्फोटामुळे पोलीस देखील आपला जीव मुठीत धरून बाहेर पडले होते.
एवढ्या मोठी घटना घडली तेव्हा घरामध्ये कोणीही नसल्यामुळे कोणालाही दुखापत किंवा जीवीत हाणी झाली नाही अथवा धोका झालेला नाही. मुस्लिम समाजाचे असणारे हे सहा कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमासाठी शहराच्या बाहेर गेलेले होते त्यामुळे परमेश्वरानेच आम्हाला वाचवले अशी प्रतिक्रिया या कुटुंबीयांनी दिलेली आहे.काळ आला होता पण वेळ आली नव्हती;मोठी जिवीत हाणी टळली मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .शासनाने पंचनामा करून झालेले नुकसान भरपाई द्यावी अशी नुकसान झालेल्या कुटुंबाकडून मागणी होत आहे.
नुकसान झालेले सविस्तर वृत्त
रहिम करीत सय्यद यांचे ४ तोळे सोने व तीन लाख कॅश जळून खाक झाली आहे. यात सलीम करीम सय्यद यांनी घर बांधकामासाठी जमापुंजी केलेली जवळपास १४ लाख कॅश आणि ७ तोळे सोने जळून खाक झाले आहे., अलीम करीम सय्यद यांचे १ लाख ८२ हजार आणि ४ तोळे सोने तसेच २० तोळे चांदी सह संसार उपयोगी ज्वारी, गहु, इतर साहित्य जळून खाक झाले आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील यांनी संसार उपयोगी साहित्य व थोडी भांडी यांना देऊन सहकार्य केले आणि संबंधित शासकीय विभाग कडून मिळेल तेवढेसहकार्य करणार याचे सांगून या कुटुंबाचे सांत्वन केले.यावेळी घटनास्थळी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,तहसीलदार अरविंद बोळंगे त्यांच्यासह स्थानिक नेते मंडळींनी पाहणी केली.
शॉर्टसर्किटेक मुळ घरगुती गॅस स्फोट झालेला पंचनामा
दि.३१ जानेवारी रोजी सात साडेसातच्या दरम्यान शहरात शॉर्टसर्किटेक मुळे घरगुती गॅस सिलेंडरचे स्फोट झाला होता. मंडळाधिकारी अमर गांधले,गाव कामगार तलाठी अशोक भातभागी यांनी पंचनामा केला.