तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील मंजूर सिटी स्कॅन मशीन लोणावळा हलविण्याचा घाट हाणून पाडणार – अमोल जाधव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शहरातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेली मर्यादित वैद्यकीय साधने व सुविधा यामुळे रुग्णांना आधीच मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता या रुग्णालयातील अत्यावश्यक मंजूर सिटी स्कॅन मशीन लोणावळा येथे हलविण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
तुळजापूरसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सिटी स्कॅन ही महत्त्वाची वैद्यकीय सेवा आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात जावे लागल्यास वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र, शासनाने अचानकपणे ही मशीन इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतल्यास जिल्हा रुग्नालयाला सळोकीपळू करू सोडू असि प्रतिक्रीया सत्ताधारी शिवसेना पक्षाचे अमोल जाधव यांनी बोलताना सांगितले. आणि स्थानिक रुग्णांची हेळसांड होवू देणार नाही.