चार चाकी गाडीचा समोरासमोर अपघात! दोन गंभीर जखमी तर दोन किरकोळ
जखमीपुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे पाठवण्यात आल्याची माहिती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील श्री नाथ लॉन्स समोर हुंडाई कंपनीच्या अल्कायझरचार चाकी गाडीचा व अल्टो कंपनीच्या वॅगनार कारची समोरासमोर अपघात होऊन दोन्ही कारमधील चार जण गंभीर स्वरूपाची जखमी झाले असून तीन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळत आहे.हा अपघात आज दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला असून जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले आहे . याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवर श्री नाथ लॉन्स समोर तुळजापूर वरून नळदुर्ग कडे जाणारी अल्टो कंपनीची वॅगनार कार क्रमांक MH12 NU0228 यात मध्ये एकूण चार जण प्रवास करत होते तर नळदुर्ग वरून तुळजापूरकडे येणारी होंडाई कंपनीची अल्कायझर क्रमांक MH25BA 8831 यात एकूण तीन व्यक्ती प्रवास करत होती.अपघातात दोन्हीही कारमधील एकूण सात जणांपैकी चार व्यक्ती गंभीर जखमी झाले असून तीन व्यक्ती किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमींची नावे पुढील प्रमाणे 1)अपर्णा घाटे वय 49 वर्षे राहणार पुणे 2)वैदही घाटे वय 26 वर्षे राहणार पुणे 3)चिंतामणी घाटे वय 55 वर्षे राहणार पुणे 4)पद्मावती नारायण घाटे वय 83 वर्षे राहणार पुणे ही जखमी आहेत जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील वैद्यकीय अधीक्षक चोरमले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश ढगे,व प्रणिता गाडेकर,अंजली घाटे,श्रीधर जाधव,राठोड,गणेश पाटील, यांनी औषध उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे पाठवण्यात आले आहे. सदर दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतेही प्रकारची जीवित हानी झाली नाही.सदर जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे पाठवण्यात आले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशावरून पोलीस कॉन्स्टेबल गणेश पतंगे व अनुप गायकवाड,व गोवर्धन माने हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.सदर 108 रुग्णवाहिकेचे चालक जाहिद पटेल यांनी तत्काळीत जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल केले.या अपघात प्रसंगी पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांनी तात्काळ दखल घेत सर्व अपघातातील जखमींना रुग्णालयात पोचवण्यासाठी मदतकार्य केले.