जिल्हा परिषद उप विभागीय कार्यालय तुळजापूर बांधकाम (ब) विभागातील सावळा चवाट्यावर
कारभार चालतो एक अधिकारी अन् एका शिपायावर – अमोल जाधव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथील जिल्हा परिषद उप विभागीय बांधकाम (ब) तुळजापूर विभागातील सावळा गोंधळ चावाटयावर अधिकारी ,कर्मचारी ,शिपाई असे मिळून एकून १८ जण या बांधकाम विभागात कार्यरत असताना फक्त एक इंजिनियर व एका शिपायावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा कारभार चालू आहे दि.३१ जानेवारी रोजी शिवसेना नेते अमोल जाधव यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची आणली अब्रू चवाट्यावर.
या ना त्या कारणाने नेहमीचं चर्चेत असणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत उप विभागीय जिल्हा परिषद कार्यालय (ब) तुळजापूर येथील सावळा गोंधळ नेहमीचं चाललेला असतो आणि त्यातल्या त्यात प्रभारी राजामुळे गुत्तेदार जोडी कायम भरलेली जात असेल.कोठ्यावधी रुपयाची तर अक्षरशःवाट यांनी लावलेली आहे.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ते केमवाडी 50 लाखाचा रस्ता , सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चिवरी ते लक्ष्मी मंदिर होत असलेला एक कोटी रुपयाचा रस्ता आहे.तसेच काटगाव ते खानापूर तीस लाख रुपये आणि दुसरा काटगाव ते खानापूर तीस लाख,जखमी तांडा व येडोळा चाळीस लाख,सिंदफळ परिसरातील मुदगलेश्वर मंदिराचे परिसर चाळीस लाखाचारस्ता कामाचे ऑनलाईन टेंडर भरलेले आहेत.मात्र दि.31 जानेवारी लास्ट तारीख असल्याने या बांधकाम विभागात एकही कर्मचारी , आधिकारी उपस्थित नाही अशा कर्मचाऱ्यावर वरिष्ठांनचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.दि.१ फेब्रुवारी २०२५ चा टेंडर रद्द करावी तुळजापूर तालुक्यातील ग्रामस्थातून व शिवसेना नेते अमोल जाधव यांनी मागणी केली आहे.