तुळजापूरहून सोलापूरकडे चाललेली लक्झरी बस तुळजापूर घाटात पलटी

तुळजापूरहून सोलापूरकडे चाललेली लक्झरी बस तुळजापूर घाटात पलटी

शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस प्रशासन तात्काळ मदतकार्यासाठी सरसावले

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूरहून सोलापूरकडे चाललेली लक्झरी बस तुळजापूर येथील घाटात पलटी, बसमधील जवळपास पन्नास प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदी येथील भाविक लक्झरी बसने तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते.

या बसमध्ये ५५ प्रवासी होते. तुळजापूरला दर्शन घेऊन परत जाताना घाटातील पहिल्या वळणावर बस (MH 12 PQ 0666) ही लक्झरी बस पलटी झाली. नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने ही बस कठड्यावर पलटी झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, खाली जवळपास तीनशे ते चारशे फूट खोल दरी होती.काही रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्यातले दहा गंभीर असल्यामुळे सोलापूरला रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!