तुळजापूरनामा न्यूज च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूरनामा न्यूज चॅनलच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन दि.२७ जानेवारी रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप अमृतराव,पत्रकार संतोष दूधभाते आरोग्य कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले,भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजेश्वर कदम,सिंदफळचे सरपंच ॲड सुजित कापसे तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार राणाजगजितसिंह पाटीलसाहेब बोलताना म्हणाले की,तुळजापूरनामा न्यूज चॅनल व तुळजापूरनामा न्युज पोर्टल हे तालुक्यातील जनतेसाठी माध्यम बनले आहे. तुळजापूरनामा न्यूज चॅनल व पोर्टलने बरीच प्रकरणांची पोलखोल करुन पिडीत नागरीकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न कायम केला असुन प्रत्येक पत्रकारांनी तुळजापूरनामा न्युज चा आदर्श घेऊन वस्तुनिष्ट – परस्थितीनिष्ठ पत्रकारिता करून जनसामान्यांस आधार-न्याय देण्याचे काम करावे. पत्रकारांनी निर्भीड वृत्ती जोपासून अन्यायाविरोधात लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडावी व जनतेच्या मनातील भारत घडवावा, पत्रकारांच्या काही मागण्या किंवा काही अडी- अडचणी असल्यास पत्रकारांनी अर्ध्या रात्री माझ्याशी संपर्क करावा, तुळजापूरनामा न्यूज च्या निर्भीड पत्रकारीतेस माझ्याकडून भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा…