तहसील कार्यालयात कायम पडीक कोतवालांवर कारवाई कधी होणार ??

तहसील कार्यालयात कायम पडीक कोतवालांवर कारवाई कधी होणार ??

तहसिलदारांच्या आदेशाल केराची टोपली – अमोल जाधव

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तहसील कार्यालय तुळजापूर अंतर्गत एकुन ३६ कोतवाल संख्याबळ विवीध सज्जावर कार्यरत असुन सदर कोतवाल
गावातील शासकीय दप्तराची ने-आण करणे,गावात दवंडी पिटवून सरकारी सूचना देणे,गावातील चावडी व तलाठी सज्जा कार्यालयाची स्वच्छता ठेवणे,गावात जमा झालेला महसूल तालुका कोषागारात जमा करणे,गावातील टपाल तालुका कार्यालयात आणून देणे
आवश्यक तेव्हा गावकऱ्यांना चावडी व तलाठी सज्जा येथे बोलावणे व तसेच तलाठी यांना शासकीय कामात मदत करणे इत्यादी कामे ही कोतवाल करतात परंतु तुळजापूर तहसील कार्यालयात तहसिलदार यांच्या आदेशाला केराची टोपली समजत गेल्या अनेक वर्षांपासून कोतवाल हे त्यांना नेमुन दिलेल्या गावी न थांबुन तहसिल कार्यालयात मलिदा कुठे मिळेल या मार्गात असताना दिसतात
कोतवाल हे
शासकीय सेवा देणे अपेक्षीत असताना आर्थिक फायद्याची दलाली करण्यासाठी कायमच तहसील कार्यालयात पडुन असल्याचे दिसुन येते.
एकुण ३६ कोतवालापैकी काही  कोतवाल हे नायब तहसीलदार, तहसीलदारांच्या घरी घरगडी म्हणून कामावर आहेत. असे निदर्शनास येत आहे. तर काही कोतवाल हे पुरवठा विभागात  दलाली करण्याच्या कामांवर आहेत तर काही तहसील कार्यालयातील आस्थापना व इतर विभागात मलीदा खात वर्षानुवर्षे तुळजापूरात पडुन आहेत. वास्तवीक गावोगावी महसुली प्रशासनाचे काम सुकर व्हावे तलाठ्याला मदत व्हावी म्हणून असलेलं हे पद वगळुन सध्यास्थीतीला तालुक्यातील प्रत्येक तलाठी खासगी रायटर कम दलाल बाळगुन व भाड्याच्या इमारतीत तलाठी कार्यालये भाटून नागरीकांची प्रचंड प्रमाणात आर्थिक पिळवणूक महसूली प्रशासन करत आहे. सर्वसामान्य ग्रामीण जनतेस मदत व्हावी म्हणून शासनव्यवस्थेने तयार केलेले जबाबदारीचे पद म्हणून कोतवाल पदास ओळखले जाते परंतु अधीकारी वर्गाने अधीकार वाणीने रझाकरी वृत्तीने या पदाचा वापर घरगडी म्हणून मागील काही वर्षांपासून बिनबोभाट करण्यात धन्यता मानली, मेहरबान तहसील प्रशासनाने थोडीफार मनाची तर जनाची बाळगुन या सगळ्या कोतवालांची चौकशी करुन तहसील कार्यालयातील बिनकामाची दलाली करत बसलेले अनेक कोतवालांस त्यांना त्यांचे मुळ कामांवर पाठवावे व सर्वसामान्य लोकांना तलाठ्याजवळील खासगी रायटर कम दलाल लोकांच्या तावडीतून सोडवीन्याचे उपकार नागरीकांवर महसुल प्रशासनाने करावे अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी होत आहे. शिवसेनेचे अमोल जाधव यांची प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!