सिंदफळ बिनशेती प्रकरण
१० ते १२ मुद्द्यांच्या आधारे करणार चौकशी
बोगस आदेशात होते तहसीलदारांची नावे; पोलिसांनी मागवले सही नमुने
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील एकाच शेतीचे दोन तहसीलदारानी दोन वेगवेगळे बिगर शेती आदेश पारित केल्याचे प्रकरण उघडकीस आले. दोन्ही आदेशावर सह्या करणारे तहसीलदार त्या वेळी कार्यरत नसल्याने तरी नावे असलेल्या तहसीलदारांच्या सहीचे नमुने तपासण्यासाठी पूरक कागदपत्रांचे नमुने पोलिसांनी मागवले आहेत. त्यामुळे तुळजापूरच्या तहसीलदारांनी जमीन घेणार व देणार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
महसूल विभागाने हा आदेश बनावट असल्याचे सांगितले आहे. तर या प्रकरणात तुळजापूर पोलिस या प्रकरणाचा मास्टर माइंड शोधण्याचा प्रयत्न करत असून, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या विविध दहा ते बारा कागदपत्रांची पोलिसांनी तहसीलदारांकडून माहिती मागवली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण हे शोधला जाईल, अशी अपेक्षा आहे. सिंदफळ येथील बोगस बिन शेती आदेश प्रकरणाचा पोलिसांनी तहसीलदारांना पत्र पाठवून या प्रकरणाशी निगडित असलेल्या सहा मुद्यावर माहिती मागवली आहे.
प्रकरणातील मास्टर माइंड शोधण्याचा प्रयत्न .सदर आदेश बनविला बाहेरील दुकानात अधिकाऱ्याचे म्हणणे सिंदफळ येथील एकाच गट शेतीचे दोन वेगवेगळे कार्यरत नसलेल्या तहसीलदारांची नावे टाकून बोगस सह्या करून बिन शेती आदेश पारित करण्यात अला. दोन ते तीन एजंट, एक स्टैंप विक्रेता व तहसीलमधील एका अधिकारी सहभागी असल्याची चर्चा सुरू आहे. सदरील आदेश तहसील बाहेरील झेरॉक्स दुकानात वेगळ्या पद्धतीने तयार केला असल्याचे एका महसूल विभागाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. कारण तहसील कार्यालय कधीच लिगल पेपर पत्र तयार करत नाही. शिवाय सदरील फॉन्ट वेगळा असल्याने तो आदेश बनावटच असल्याचा दावा त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
पोलिसांनी ही माहिती मागवली, याद्वारे होणार तपास
- दस्त क्रमांक ६०३७/२०२४ मधील गट क्र. १७६ क्षेत्र १ हेक्टर २० आरचे २८-१२-२०२२ अन्वये अकृषीची मंजुरीचे जावक पत्र. आदेशावर स्वाक्षरी असल्याने तहसीलदार योगीता कोल्हे यांच्या कार्यकाळाची माहिती. त्यांच्या सहीचे तीन मूळ कागदपत्रे.
दि. २८.१२-२०२२ ते ०९-१२-२०२४ या कालावधीत तहसीलदारांची माहिती. त्यांच्या सहीचे तीन मूळ कागदपत्र. आरोपी पवनजीतकौर गिरवरसिंग सुखमणी यांनी अकृषिक करण्यासाठी केलेला अर्ज. तलाठी मंडळ अधिकारी यांचा स्थळ पहाणी व पंचनामा अहवाल. सदरील शेतीचे बिन शेती आदेशानंतर कोणत्या तहसीलदाराने डीएससी लावली होती. यासह अन्य काही मुद्द्यांची माहिती मागवली.
नोंदणी व मुद्रांक विभाग
दुय्यम निबंधक श्रेणी- १, तुळजापूर
सिंदफळ येथी भोगस जमिन खरेदी प्रकरणी घेणार देणार वर गुन्हे पोलिस प्रशासनाने दाखल केले आहेत. त्या नंतर भोगस जमिन खरेदी प्रकरणी दोन साक्षीदार, एजेन्ट आणि दस्त तयार करनारे संबंधित खाजगी व्यंतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांचे म्हणूने पाहुन त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील.
- सब रजिस्टार बालाजी मादस्वार
नोंदणी व मुद्रांक विभाग
दुय्यम निबंधक श्रेणी- १, तुळजापूर