विद्युत वितरण कंपनी भूम कडून वीजबिल वसुली जोमात
भूम : औदुंबर जाधव
तालुक्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा सर्व ग्राहकांकडे साधारणतः 2 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर त्यामुळे आर्थिक अडचणीतील ‘महावितरण’ने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे या वीज खंडित मोहिमेच्या माध्यमातून जवळपास चालू थकबाकी सह 70 लाख रुपये थकबाकी वसूल झाली आहे. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वीजबिलांच्या वसुलीवरच ‘महावितरण’चा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे. एक दोन महिन्यात वीजबिलांच्या थकबाकीमध्ये वाढ झाल्यामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
तसेच खंडित केलेल्या वीजजोडण्याची तपासणी करीत आहे. यासोबतच सहाय्यक अभियंता धुमाळ साहेब, वरिष्ठ तंत्रज्ञ लिमकर कर्मचारी शेख शिकाऊ उमेदवार सरफराज शेख व मीटर रिडिंग एजन्सी चे मालक श्री गणेश वीर यांच्यासह सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी आणि विशेष पथके थकबाकी वसूलीसाठी ‘ऑन फिल्ड’ आहेत. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोय होणे आदी टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी, असे आवाहन यांनी केले आहे.