आई तुळजाभवानीच्या दर्शनाने ऊर्जा मिळते – उद्योजक मा. श्री.रवीकांत तुंगार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दि.२४ जानेवारी रोजी ८ च्या दम्यान संध्याकाळी दर्शन झाल्यानंतर मंदिर संस्थान येथे पुष्पगुच्छ देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला त्यावेळी आई तुळजाभवानीच्या दर्शनाने ऊर्जा मिळते बोलताना म्हणाले.यावेळी तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक जनमत तालुका प्रतिनि धीज्ञानेश्वर गवळी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट )श्रीकृष्ण सूर्यवंशी,पुजारी दिनेश कापसे आदी उपस्थित होते.पवनचक्की सिवील आर्कीटेक्टचर व डिझाईन तज्ञ श्री रवीकांत तुंगार साहेबांची श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले..

पवनचक्की निर्माण कामाचे जुने अभीयंता व तज्ञ असा परीचय असलेले श्री रवीकांतजी तुंगार हे शुक्रवार रोजी सायंकाळी ८ वाजता देवीजींच्या दर्शनासाठी आले असता मंदीर संस्थानच्या वतीने शाल श्रीफळ व देवीजींची प्रतीमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पवनचक्की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतील सुरुवातीच्या काळातील तज्ञ आर्किटेक्ट अशी ओळख श्री तुंगार साहेबांची असुन याअगोदर तुंगार साहेबांनी सिमेन्स गमेसा या कंपनीचा पवनचक्की विजनीर्मीतीचा प्रोजेक्ट तुळजापूर-लोहारा तालुक्यात उभारण्याच काम त्यांनी यशस्वीपणे केलेले आहे. सदर प्रोजेक्ट तयार करताना शेतकरी वर्गाला खुप सहकार्य केल्याची चर्चा आजही ग्रामीण भागातील शेतकरी करताना दिसत आहे, यापूर्वी पवनचक्की उभारणी करत असताना ५ एकर जमीनीची थेट खरेदी पवनचक्की कंपन्या करत होत्या त्यामुळे जमीन मालक शेतकर्याला फक्त जमीनीची विक्री किंमत मिळत होती परंतु तुंगार साहेबांनी या प्रक्रियेत पवनचक्की कंपन्यांना बदल करावयला लाऊन फक्त २ एकर जमीनीची खरेदी व बाकी जमीनी ह्या भाडेतत्त्वावर घ्यायला लाऊन शेतकऱ्यांना कायमस्वरुपी शाश्वत उत्पनाची व्यवस्था करुन दिली याच बदलामुळे अनेक शेतकर्यांना जमीनीच्या भाडेकराराच्या मोबदल्यात चांगले अर्थीक उत्पन्न मिळत असुन याचे श्रेय तुंगार साहेबांना जात आहे व याबद्ल तुळजापूर व लोहारा तालुक्यातील शेतकरी आजही तुंगार साहेबांचे आभार व्यक्त करताना दिसतात.