धाराशिव येथील मसूल प्रशासनाचे बनावट कागदपत्रा अधारे नोंदी घेतल्याले प्रकणे उघड होणार का ?

धाराशिव येथील मसूल प्रशासनाचे बनावट कागदपत्रा अधारे नोंदी घेतल्याले प्रकणे उघड होणार का ?

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव तालुक्यातील उपळे (मा) येथील गट नं. 780 पैको क्षेत्र 0 हे 90 आर हे क्षेत्र बनावट कागदपत्रा अधारे नोंदी घेतल्या प्रकणी संबंधीत तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणे बाबत. दि.२३ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते सुनील घाडगे यांनी जिल्हाधिकारी निवेदन दिले आहे.

निवेदनात असे नमूद केले आहे की, उपळे (मा) तालुका धाराशिव येथील सन 2017-2018 मध्ये कार्यरत असलेले तलाठी गोकुळ शिंदे व तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी संगणमत करुन बनावट कागदपत्र तयार करुन सुनिल घाडगे यांची आज्जी कै. पमाबाई गणपत घाडगे यांच्या नावे असलेली मौजे उपळे (मा) येथील गट नं. 780 पैकी क्षेत्र 0 ह 90 आर ही जमीन त्यांच्या मृत्यु पश्च्यात भरत पडवळ, दत्ता पडवळ, आगतराव पडवळ यांच्याकडुन आर्थिक देवानघेवान करुन रुपये 100 च्या स्टॅम्प व बनावट कागदपत्रा अधारे नमुद व्यक्तीच्या नावे करुन दिली.

सदर फेरफार करते वेळी कै. पमाबाई गणपत घाडगे यांचे वारस हयात असताना त्यांना अंधारात ठेवुन त्यांच्या परस्पर नमुद जमीन ही वरील व्यक्तींच्या नावे करण्याचे कृत्य तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करुन गंभिर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे. या संदर्भात आपल्या कार्यालयाकडे वारंवार तक्रारी अर्ज देवुनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही याचे कारण स्थानिक मंडळ अधिकारी असल्याने प्रशासनावर दबाव टाकुन कार्यवाही अडविण्यात आलेली आहे.

या प्रकरणात आपल्या कार्यालयाकडे माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 नुसार माहितीची मागणी केली असता गोल माल माहीती देवुन दिशाभुल केली आहे. या प्रकरणातील कागदपत्र धाराशिव तहसिल कार्यालय येथील रेकॉर्ड रुम मधुन गायब करण्यात आलेली आहेत. तसेच फेर घेतलेली संचिका उपलब्ध नसल्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे. व काही स्थानिक पंचनामे बोगस करण्यात आलेले आहेत याचे सर्व पुरावा उपलब्ध आहेत.

आशाच प्रकारे तलाठी गोकुळ शिंदे हे मौजे शिंगोली ता. जि. धाराशिव येथे कार्यरत असताना बनावट दस्तऐवज प्रकरणी आनंद नगर पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर दिनांक 26/05/2024 रोजी कलम 420 नुसार गुन्हा हि नोंद झालेला आहे.

मौजे उपळे (मा) ता. धाराशिव येथील गट नं. 780 पैकी क्षेत्र 0 हे 90 आर हे क्षेत्र बनावट कागदपत्रा अधारे नोंदी घेतल्या प्रकरणी संबंधीत तलाठी गोकुळ शिंदे व मंडळ अधिकारी 1) आर. एस. नाईकनवरे 2) बी.बी. राऊत 3) ए.बी. तिर्थकर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावे तसेच त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी करुन त्याच्यावर कडक गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे या निवेदनावर सुनील घाडगे यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!