तुळजापूर शहरात मंत्री बावनकुळे, प्रताप सरनाईक, गोरे, आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा नागरी सत्कार
तीर्थक्षेत्र विकासासासाठी निधी दिल्याबद्दल सपकाराचे आयोजन
तुळयापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मंदिर आणि तुळजापूर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारकडून ऐतिहासिक निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे व मित्राचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा गुरूवारी दि.७ ऑगस्ट रोजी सायं.५.२५ वाजता तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तुळजापूर येथील श्री भवानी कुंड, घाटशिळ रोड परिसरात हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. या सत्कार सोहळ्यास महंत तुकोजीबुवा, महंत इछागिरी महाराज, महंत योगी मावजीनाथ बाबा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत व्यंकट अरण्य महाराज, गुरू महंत वाकोजीबुवा, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आ. सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री तानाजी सावंत, आ.अभिमन्यु पवार,आ.सुरेश धस,आ.विक्रम काळे,आ.सतीश चव्हाण,माजी खा.रविंद्र गायकवाड,माजी आ. राजेंद्र राऊत,नितीन काळे, अनिल काळे,भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, महेंद्र धुरगुडे, नेताजी पाटील, नारायण नन्नवरे, ॲड.अशिप सोनटक्के, ॲड. दीपक आलुरे,ॲड,दीपक आलुरे,अनंत पांडेंगळे,तानाजी कदम, ता.अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, ता.अध्यक्ष अमोल जाधव यांची उपस्थिती राहणार आहे,या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदि,ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज हे असणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विनोद गंगणे, आनंद कंदले, सचिन रोचकरी, शांताराम पेंदे आदींनी केले आहे.