पवन चक्की टावर लाईन बाधित शेतकऱ्यांना न्याय मागून मिळणार की भांडून मिळणार – श्रीकृष्ण सूर्यवंशी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील रिन्यू पवनचक्की कंपनीच्या टावर लाईन बद्दल तक्रारी अर्ज व पाठपुरावा करून चिवरी – उमरगा येथील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबटे झिजवून थकले प्राप्त माहिती नुसार शेतकऱ्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) पार्टीचे तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांच्याकडे तक्रारीचा रीतसर 34 टावर बाधित शेतकऱ्यांनी लेखी अर्ज दिला होता या शेतकऱ्याच्या सर्व मागण्या संदर्भात तालुका अध्यक्ष यांनी (महाराष्ट्र शासनाचा जी आर ) सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट जोडून मुद्देसुद अर्ज लिहून कंपनीच्या चालू असलेल्या टावरच्या कामातून शेतकऱ्यावर होणाऱ्या संभावित व झालेल्या अन्यायाबाबत व रिन्यू कंपनीचे अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या संगनमताने शेतकऱ्यावर बळ पूर्व जमिनी देण्यास भाग पाडण्याच्या प्रकाराचा उल्लेख पुराव्यासहित करूनही दिनांक १ जानेवारी 2025 रोजी दिलेल्या सविस्तर अर्जावर आजतागायत कुठलीच कारवाई प्रतिक्रिया न करता संबंधित अर्जाला जिल्हाधिकारी र्यालयाकडून कोणता अभ्यास चालू आहे. नुतन उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांना विचार ना केली असता ते येत्या आठ दिवसात मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो असे म्हणाले असे ठेवणीतले उपजिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिले.सदरील प्रकरणात अन्यायग्रस्त शेतकऱ्यासोबत महाराष्ट्र शासनाच्या जीआर चे उल्लंघन केल्यामुळे रिन्यू कंपनीवर कठोरातील कठोर फौजदारी कारवाई अपेक्षित असताना कदाचित प्रशासन पवन चक्की कंपनीच्या राजकीय लागेबंध पाहून घाबरले का ? किंवा कोणत्या अर्थपूर्ण तडजोडीचे वाट प्रशासन पाहत आहे का ? आसा प्रश्न आंदोलन कर्त्या शेतकऱ्याला पडला आहे.दैनिक जनमतशी दूरध्वनीवर बोलताना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दप्तर दिरंगाई कायदा 2006 प्रमाणे कारवाईची मागणी करू असे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले. असून प्रशासनाने शेतकऱ्याला आडानी न समजता ताबडतोब जन सुनावणी लावून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे प्रति टावर बाधित शेतकऱ्यांना वीस लाख रुपये व प्रति ताराबादीत शेतकऱ्यांना पाच लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देऊन रिन्यू कंपनीचे काम राजीकुशी अहोरात्र चालू द्यावे