कार्यकर्त्यांना पुढे करून;आमदार व खासदार साधत आहेत का ? निशाणा..
नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम
निर्माण करून आंदोलन करणे हे एक केवळ बनाव आहे – ॲड विशाल साखरे…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव शहरात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या समोर शिवसेना उबाठा गट धाराशिव यांच्या वतीने पोस्टर व बॅनर बाजी करून दि.७ ऑगस्ट रोजी आंदोलन जे केले आहे. त्यात जास्तीत जास्त पक्षाचे कार्यकर्ते दिसत आहेत. वास्तविक बोंबले हनुमान चौकापर्यंत रस्ता सुधारणा करावी ही स्थानिक नागरिकांची मागणी अतिशय रास्त आहे.व बरोबर आहे. पण या मागणीसाठी उबाठा गटाचे आमदार उपस्थित दिसून येत नाहीत.सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तथा मा. नगरसेवक ॲड विशाल साखरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
आंदोलन हे केवळ बनाव केल्याचे स्पष्ट दिसत आहे.रस्त्याचा प्रश्न सोडवणे हे मतदार संघातील विद्यमान आमदारांचे परमकर्तव्य आहे, ना की कार्यकर्त्यांनापुढे करून आंदोलन करून संभ्रम निर्माण करणे कितपत योग्य आहे.बऱ्याच दिवसापासून रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तर हे टेंडर अथवा वर्क ऑर्डर संदर्भात काही अडचण असेल तर आमदार कैलास पाटील यांनी आत्ता पर्यन्त काय केले ? वास्तविक भुयारी गटार योजने मुळे अनेक ठिकाणी खड्डे खोदून रस्ते उघडून ठेवलेले आहेत. संबंधित प्रशासन त्यावर काम करत आहेत.खासदार ओमराजे निंबाळकर हे जनतेचे प्रश्न सोडवताना दिसतात तसे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. स्वःता मी ही पाहिले आहेत पण त्यांच्यावर पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असेल तर विद्यमान आमदार कैलास पाटील यांनी दूरावस्था झालेल्यारस्त्याची दुरुस्तीसाठी काही निधीची तरतूद करून तेवढा स्थानिक नागरिकांचा गहन प्रश्न सोडवणे त्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. ना की कार्यकर्त्या मार्फत आंदोलन करायला लाऊन जनतेच्या नजरेत धुळफेक करून स्वतःच्या मतदार संघात स्वतःची जबाबदारी पासून परावर्तित होताना दिसत आहेत.
तसेच वास्तविक सोशल मीडिया फेसबुक च्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ तयार केला ज्या मध्ये निरागस लहान मुले व मुली त्यांच्या पाठीवर दप्तर अडकून त्यांच्या हातात बॅनर दिली आहेत. वास्तविक लहान शाळकरी मुलांना रस्त्याचा त्रास होत असेल हे नक्की! पण आंदोलनात त्यांचा सहभाग नोंदवणे हे अयोग्य आहे का ? माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाने एका प्रकरणात असे सांगितले आहे की,लहान मुलांना शाळकरी असो अथवा नसो त्यानं राजकीय पक्षाच्या आंदोलनात सहभागी करणे अयोग्य नाही ? मग असे असताना लहान निरागस मुलांच्या हाती राजकीय हेतू ठेऊन बॅनर बाजी करायला लावणे व लहान मुलांना कर्वे आंदोलन करणे व ते फेसबुक च्या माध्यमातून लाईव्ह करणे हे कायद्याच्या कक्षेत बसत नाही. तसेच अशा प्रकारे आंदोलन करणे हे त्या लहान मुलांच्या हक्क व अधिकाराचे उलंघन आहे. त्या बाबत प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे स्थानिक नागरिकांच्या नजरा उंचावल्या आहेत.शासनाने दखल घेणे ही बाबा अत्यंत महत्वाची आहे.पण हे आंदोलन असे समजावे का? की उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि इतर आघाडीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच विद्यमान आमदार व खासदारांनी दिलेला घरचाच आहेर आहे का ?महायुती सरकार सत्तेतले
ॲड,विशाल प्रभाकर साखरे जिल्हा प्रवक्ते,धाराशिव. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी जिल्हा प्रवक्ते या नात्याने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांची बाजू मांडली आहे.यावर शासन गांभीर्याने दखल घेणार का ? का “तेरी बी चूप” मेरी बी चूपची” भूमिका बजावणार असाही टोला मारला आहे.