नळदुर्ग प्रकरण; जिल्हा व सत्र न्यायालयाकडून खून प्रकरणात मुख्य आरोपीस अखेर जामीन मंजूर – ॲड विशाल साखरे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नळदुर्ग येथील शिवराज बार आणि हॉटेल समोर घडलेल्या थरारक खून प्रकरणातील मुख्य आरोपी जयकुमार गायकवाड यांना धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर.
नळदुर्ग पोलीस ठाण्यांतर्गत दिनांक २८/०५/२०२५ रोजी गुन्हा रजिस्टर नोंद क्र.१९३/२०२५ यु/एस १०३, ३(५) बीएनएस ॲन्ड यु/एस ४,२५ ऑफ Arms Act अन्वये नोंद झाला होता सदर प्रकरणात दिनांक २७/०५/२०२५ रोजी शिवराज बार आणि हॉटेल समोर घडलेल्या थरारक खून केल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या पैकी मुख्य आरोपी जयकुमार गायकवाड यांचा जमीन अर्ज ॲड,विशाल प्रभाकर साखरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात ठेवला होता. सदरील सुनावणी ही मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश औटी यांच्या न्यायालयात झाली. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीत ॲड, विशाल साखरे यांनी सदरील मुख्य आरोपीचा गुन्ह्यात कोणताही संबंध नाही तसेच सदर आरोपीने मयतावर प्राणघातक हल्ला केलेला नाही. व सीसीटीव्ही फुटेजचे अवलोकन केले असता सदर मयत व्यक्ती हा आरोपीवर चाकूने हल्ला करत असून चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. वास्तविक आरोपीने आत्म संरक्षण करत असून उलट मयत व्यक्ती हाच आरोपीवर हल्ला करत असताना ही घटना घडल्याचा युक्तिवाद केला. तसेच आरोपी श्वेता गायकवाड महीला आरोपी ही घटना घडली त्या वेळी ती तिच्या घरीच उपस्थित होती. पोलिसांनी केवळ तिला मोबाईल वरील संभाषणाच्या आधारे गुन्ह्यात आरोपी केले असून या प्रकरणात मुख्य आरोपी जयकुमार याने कोणताही कट मयत व्यक्तीस मारण्यास रचलेला नाही आणि घटना ही शिवराज बार समोर अचानक घडली परंतु या घटनेत कोणताही कट रचला गेला नसून मुख्य आरोपी जयकुमार यास गुन्ह्यात विनाकारण अडकवल्याचा युक्तिवाद सादर केला.पोलीसांनी गुन्हा घडल्या नंतर तत्काळ घटनास्थळाला भेट दिली होती दिनांक २७/०५/२०२५ रोजी गुन्हा नोंदवणे अपेक्षित असतानाही पोलिसांनी फिर्यादीची एक दिवस वाट पाहिली व फिर्यादी दुसऱ्या दिवशी आल्यावर उशिराने गुन्हा नोंद केला. वास्तविक मयत हा हॉटेलवर पूर्वीच होता व त्याने मद्यपान करून जयकुमार गायकवाड याच्यावर चाकूने हल्ला देखील केला होता मयताने चाकूने जयकुमार गायकवाड यांच्यावर जीवघेणाहल्ला केल्याने सदर घटना घडल्याचा युक्तिवाद ॲड. विशाल साखरे यांनी केला. युक्तिवादाच्या पुष्टी करिता ॲड . साखरे यांनी मा. सर्वोच व उच्च न्यायालयाचे विविध मुद्द्यावर न्यायनिवाडे सदर करून सक्षम असा युक्तिवाद सादर केला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश औटी साहेब यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी जयकुमार गायकवाड यांचा जामीन दिनांक ०६/०८/२०२५ रोजी मंजूर केला. या प्रकरणी ॲड.विशाल साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे तसेच ॲड,महेश लोहार,ॲड,शुभम तांबे,ॲड,अर्चना कांबळे,ॲड लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड अमित गोळे,ॲड,उदय आडेकर,ॲड,संकेत गोरे, ॲड रोहीत लोमटे,ॲड महेश पवार यांनी कामकाज पाहण्यास. सहकार्य केले.