तीर्थक्षेत्र विकासासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल तुळजापूर शहरवासीयांच्या वतीने भव्यनागरी सत्काराचे आयोजन

तीर्थक्षेत्र विकासासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल तुळजापूर शहरवासीयांच्या वतीने भव्यनागरी सत्काराचे आयोजन

सत्कारमूर्ती मंत्री बावनकुळे, प्रताप सरनाईक, जयकुमार गोरे,आ.राणाजगजितसिंह पाटील यांचा नागरी सत्कार

तुळयापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मंदिर आणि तुळजापूर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारकडून ऐतिहासिक निधी मंजूर झाला आहे. तुळजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे व मित्राचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा तुळजापूर शहरवासी यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा गुरूवारी दि.७ ऑगस्ट रोजी सायं.५.२५ वा. श्री भवानी कुंड, घाटशिळ रोड परिसरात हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. दि.६ ऑगस्ट रोजी भवानी तीर्थकुंड येथे प्रकार परिषद आयोजित करून तुळजापूर शहराच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.यावेळी नेते विनोद गंगणे,माझे नगराध्यक्ष सचिन रोचकरी,आनंद कंदले, सचिन कदम,औंदुंबर कदम, राजेश्वर कदम, शांताराम पेंदे, नरेश अमृतराव, धर्यशील दरेकर, उमेश गवते, सचिन कदमसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

तुळजापूर शहराच्या वतीने भव्य दिव्य नागरिक सत्कार

या सत्कार सोहळ्यास महंत तुकोजीबुवा, महंत इछागिरी महाराज, महंत योगी मावजीनाथ बाबा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत व्यंकट अरण्य महाराज, गुरू महंत वाकोजीबुवा, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आ. सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री तानाजी सावंत, आ.अभिमन्यु पवार,आ.सुरेश धस,आ.विक्रम काळे,आ.सतीश चव्हाण,माजी खा.रविंद्र गायकवाड,माजी आ. राजेंद्र राऊत,नितीन काळे, अनिल काळे,भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, महेंद्र धुरगुडे, नेताजी पाटील, नारायण नन्नवरे, ॲड.अशिप सोनटक्के, ॲड. दीपक आलुरे,ॲड,दीपक आलुरे,अनंत पांडेंगळे,तानाजी कदम, ता.अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, ता.अध्यक्ष अमोल जाधव यांची उपस्थिती राहणार आहे,या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदि,ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज हे असणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा नेते विनोद गंगणे, तालुकाध्यक्ष आनंद कंदले, मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी, शांताराम पेंदे आदींनी केले आहे.

शहराचा विकास नाही झाल्यास राजकीय संन्यास घेणार – विनोद (पिटू) गंगणे

तुळजापूर शहर विकास आराखड्यासाठी 1865 कोटी निधी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मंजूर करून आणला आहे.शहराचा विकास नाही झाल्यास राजकीय संन्यास घेणार आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विनोद पिटू गंगणे बोलत होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!