रिन्यु वायु उर्जा प्रा.लि.कंपनी मनमानी करत शेतकऱ्याच्या भवितव्यावर नांगर फिरव आहे
धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील कावलदरा ( बावी ) येथील शेतकऱ्यांच्या शेतात रिन्यु वायु उर्जा प्रा.लि. कंपनीने बोगस, बनावट कागदपत्रे तयार करून मालकीच्या जमीनीमध्ये बेकायदेशीररित्या विद्युत पोल रोवले बाबत कंपनी विरूध्द कायदेशीर कार्यवाई करण्या बाबत दि.९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी तथा
अध्यक्ष पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हा स्थरीय सनियंत्रण समिती कार्यालय धाराशिव यांना शेतकरी अरुण राजेंद्र पवार यांनी दिले आहे,.
निवेदनात अस नमूद केले आहे की, धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथील रहिवाशी जमीन गट नं. 82 मध्ये शेती करून स्वतःची व कुटूंबाची उपजिवीका भागवितो. जमीन ही नॅशनल हायवेलगत आहे.
माझे वडिल किंवा माझे कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीने रिन्यु वायु उर्जा प्रा.लि. कंपनीला त्यांचे पवनचक्कीचे पोल उभा करण्याबाबत कोणतीही संमती अथवा बॉड पेपर किंवा नोटरी करून दिलेली नाही त्यांचेसोबत करार केलेला नव्हता व नाही. असे असताना सदरील कंपनीने बनावट व खोटे कागदपत्रे बॉड पेपर तयार करून व सदर कागदोपत्री माझे वडिल यांचे अंगठे मारून बेकायदेशीररित्या जमीनीमध्ये पोल रोवण्यात आलेले असुन त्याच्या विद्युत तारा ओढण्यात आलेल्या आहेत. वास्तविक पाहता वडिल हे सही करीत असुन सदर बनावट कागदोपत्री त्यांचे अंगठे करण्यात आलेले आहेत, यावरून हे स्पष्ट होते की, सदरील कागदपत्रे हे खोटे व बोगस आहेत.
त्यानंतर रिन्यु वायु उर्जा. प्रा.लि. कंपनीला दि.03/01/2025 रोजी अर्ज करून त्यांना सदरील बेकायदेशीररित्या जमीनीत रोवण्यात आलेले पोल काढण्याबाबत व आपसात झालेला ओरीजनल करार दाखवावे म्हणून अर्ज दिला होता, परंतु त्यांनी शेतकऱ्यांच्या अर्जाची कसलीही दखल घेतली नाही व खोट्या आशयाची नोटीस पाठवून नाहक त्रास देत आहेत. सदरील अर्जाची एक प्रत संबंधीत पोलीस निरीक्षक , पो.स्टे. धाराशिव ग्रामीण यांना देखील दिलेली आहे
तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधीत रिन्यु वायु उर्जा प्रा.लि. कंपनीने तयार केलेले बोगस कागदपत्रांची पडताळणी करून चौकशीअंती त्यांचेविरूध्द योग्य ती कार्यवाही करून बाधित शेतकऱ्यांना योग्यतो मोबदला द्यावा या निवेदनावर शेतकरी अरूण राजेंद्र पवार यांची स्वाक्षरी आहे
माहितीस्तव
- मा. पोलीस अधिक्षक साहेब, पोलीस अधिक्षक कार्यालय, धाराशिव
- मा. पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस स्टेशन ग्रामीण धाराशिव यांना हि प्रत दिलेल्या आहेत

