तुळजापूर तालुका पञकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळीतुळजापूर तालुका पञकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळवार दि १४ रोजी संपन्न झाला.प्रारंभी तुळजापूर तालुका पञकार संघाची दिनदर्शिका श्री तुळजाभवानी चरणी अर्पण करण्यात आली त्या नंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशाषकिय कार्यालयात श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान चे धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, विश्वास परमेश्वर – कदम, जयसिंग पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले ,आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चोपदार ,ज्येष्ठ पत्रकार ए.टी.पोफळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .यावेळी गोविंद खुरुद , डॉ सतिश महामुनी ,अनिल आगलावे, श्रीकांत कदम,संजय खुरुद,सिध्दीक पटेल, शुभम कदम, सुरज बागल, सचिन ठेले,अकबर शेख ,दादा नवगिरे,प्रविण कदम, पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, प्रेस फोटोग्राफर सतिश पवार सह प्रतिष्ठात नागरिक पञकार मोठ्या संखेने उपस्थितीत होते.दिनदर्शिकेत देविचे वर्षभराचे धार्मिक विधी तुळजापूर तालुका पञकार संघाने काढलेल्या दिनदर्शिके मध्ये महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेचे वर्षभराचे दोन्ही नवराञोत्सवातील धार्मिक विधी सह दैनदिन कार्यक्रम असल्याने याचा लाभ पञकारांना व भक्त मंडळीना वर्षभर होणार आहे.