तानाजी म्हेत्रे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई,संयोजक मा.प्रा.डॉ.बापूसाहेब आडसूळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 जानेवारी रोजी धाराशिव येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-२०२५ आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र विद्यालय,तीर्थ बुद्रुक तालुका तुळजापूर येथील सहशिक्षक तानाजी सयाजी म्हेत्रे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संपूर्ण राज्यभरातून शिक्षक,कर्मचारी मुख्याध्यापक ,प्राचार्य आणि आदर्श शाळा या सर्वांना मिळून एकूण ५५ पारितोषिके देण्यात आली.कार्यक्रमाप्रसंगी संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने शिक्षक व कर्मचारी हजर होते.