तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी डॉक्टरला पाचदिवस पोलिस कोठडी
पुण्यातून डॉ रमेश लबडे यांना घेतले ताब्यात
तुळजापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील कॉलेज कन्येवर अत्याचार करणाऱ्या डॉ रमेश लबडे यास पोलिसांनी शनिवार दि. ११ रोजी रात्री पुण्यात ताब्यात घेतलेतालुक्यातील मंगरुळ येथील ओमसाई क्लिनिक येथील डॉ. रमेश लबडे यांच्याविरोधात उपचारास दवाखान्यात आलेल्या युवतीवर अत्याचार केल्याची फिर्याद दि.१ नोव्हेंबर २०२४ रोजी दिली होती. या प्रकरणी पोलिसांना डॉ लबडे पुण्यात असल्याची माहीती मिळाताच तात्काळ पोलिस स्टेशन च्या पथकाने शनिवार दि.११ रोजी पुण्यात जावुन त्यास जेरबंद व राञी तुळजापूर पोलिस ठाण्यात हजर केले.दि.१७ जानेवारी पर्यंत ,पाच दिवस पीसीआर मिळाला आहे.