सूडबुद्धीने जिल्हाधिकाऱ्यांनी एका प्रामाणिक मराठा अधिकाऱ्यावर निलंबनाची केली कारवाई.
जिल्हाधिकारी सचिन ओंम्बासे यांची बदली करा अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरायला कमी करणार नाही.
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव येथील उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचे सूडबुद्धीने केलेले निलंबन रद्द करून जातीवादी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांची बदली करावी अशी मागणी तुळजापूर येथील मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री – अजितदादा पवार, आणि महसूल मंत्री यांच्या कडे केली आहे. तुळजापूर विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर दि. १८ नोव्हेंबर रोजी आणि विधानसभा निवडणुकीनंतर नोव्हेंबर रोजी दि.२९ दोन अहवाल तुळजापुरचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजयकुमार डव्हळे यांनी निवडणूक आयोगास पाठवले होते. ज्यामध्ये त्यांनी निवडणुकीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी निवडणूक कामात आणलेला अडथळा, मनोज जरांगे पाटलांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला तुच्छ वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा का दाखल केला म्हणून ओम्बासे यांनी केलेली अश्लील शिवीगाळ, जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी केलेली जातीवाचक टिप्पणी, संजयकुमार डव्हळे – पाटील यांचं करियर उध्वस्त करून टाकण्याची जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी दिलेली धमकी या आशयाचे दोन अहवाल निवडणूक आयोगाला पाठवले आहेत.त्यावर दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने चौकशी समिती गठीत केली आणि चौकशीसाठी विभागीय आयुक्तांनी दि ९ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली. त्या सुनावणीला जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ फिरवून आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि सुनावणीला गैरहजर राहिले. तसेच जिल्हाधिकारी यांना सुनावणीला बोलावले होते याचा राग मनामध्ये धरून जिल्हाधिकारी यांनी महसूल मंत्र्यांना तसेच सचिवांना बोलून उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांना डि ७ जानेवारी २०२४ रोजी निलंबित केले. स्वतः निवडणूक आयोगाच्या चौकशीतून वाचण्यासाठी जातीवादी जिल्हाधिका-यांनी एका प्रामाणिक मराठा अधिकाऱ्यावर सूड भावनेने निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे तात्काळ संजयकुमार ढव्हळे यांचा निलंबनाचा आदेश रद्द करून जातीवादी जिल्हाधिकारी सचिन ओंम्बासे यांची बदली करा अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही मराठा समाजाच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे.या निवेदनावर गणेश पाटील, आदित्य देशमुख, विठ्ठल पवार, आदित्य जिवनराव गोरे, विठ्ठल झाडे पाटील, शेषराव मोहिते, गजानन जाधव, यांच्या स्वाक्षरी आहेत.
