पवनचक्कीच्या गुत्तेदार आणि गुंडाकडून शेतकरी सचिन ठोंबरे यांना बेदम मारहाण
जेएसडब्लू पवनचक्की कंपनीचे श्रीराम वनवे यांच्यावर गुन्हा दाखल
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथील शेतकरी सचिन ठोंबरे यांना पवनचक्कीच्या गुत्तेदार आणि गुंडाकडून बेदम मारहाण करण्यात आली होती त्या प्रकरणात जेएसडब्लू पवनचक्की कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी श्रीराम वनवे, रितेश कवडे व इतरावर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वनवे हे पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीला उपस्थितीत होते, शेतकऱ्याला गुंडाना सोबत घेऊन मारहाण करणारे त्या बैठकीत प्रशासनाला उपदेश व सल्ले देत होते हे विशेष.मारहाण करणाऱ्या गुंडावर कारवाई करावी या मागणीसाठी ठोंबरे कुटुंबियाने उपोषण केले होते त्याला आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भेट देऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते तसेच प्रशासनास याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.पवनचक्कीसाठी गट न 81 मधील 20गुंठे जमीन भाडेतत्वावर दिलेली आहे. पवनचक्कीचे लोक 20 गुंठे जमीन न वापरता 30 ते 35 गुंठे जमिनीवर अतिक्रमण केले. फिर्यादीचे शेतातील लिंबाचे, बाभळीचे, बोराचे झाडे हे आरोपितानी कुठलीही परवानगी न घेता तोडत असताना झाडे तोडू नका अशी विनंती केली तरी डोक्यात रॉड घालून जखमी करीत शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाण प्रकरणात 2 वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. रोपी दादा पवार, अंकित मिश्रा, वैभव कदम व इतर सात जणावर कलम 118(1),191(2),191(3),190,352,351(2), (3) भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा नोंद आहे.