पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांचा केला गौरव !

शारदीय नवरात्र महोत्सव – २०२४ ;उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचा गौरव

पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांचा केला गौरव !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

ऑक्टोबर २०२४ मध्ये श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर येथे शारदिय नवरात्र महोत्सव शांततेत पार पडला. या महोत्सवात सामाजिक सलोखा अबाधित ठेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता सर्व काही शांततेत पार पडले. या शारदीय नवरात्र महोत्सवात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तुळजापूर शारदिय नवरात्र महोत्सव बंदोबस्त यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल पोलीस निरीक्षक रविद्र खांडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे, पोलिस सहाय्यक निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलिस उपनिरिक्षक अनिल धणुरे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोठे, पोलीस उपनिरीक्षक कल्यान पवार, पोलीस अंमलदार गोवर्धन माने, अनुप गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव राऊत, कमलकिशोर राऊत, रवी भागवत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तुळजापूर शारदिय नवरात्र महोत्सव बंदोबस्त व्यवस्थेचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि समर्पण खरोखरच कौतुकास्पद गौरवोउद्गार पोलीस अधीक्षक यांनी यावेळी काढले. तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवात नेमुन देण्यात आलेली भुमिका आणि जबाबदाऱ्यांप्रती असलेली बांधिलकीमुळे बंदोबस्त यशात महत्वपूर्ण योगदान दिले असेही ते म्हणाले.अधिकारी,कर्मचाऱ्यांचा गौरव केल्यामुळे जिल्हाभर सर्वत्र पोलीस दलात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!