बोगस एन ए ,बनावट दस्तऐवज प्रकरण कसून चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करणार – पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव तहसील कार्यालय व तुळजापूर तहसील कार्यालय येथील बोगस एन ए प्रकरण करून ,तुळजापूर येथील सब रजिस्टर येथे बनावट दस्तऐवज झाल्या प्रकरणी दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी तुळजापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी या प्रकरणातील जे जे दोषी असतील त्यांची कसून चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे पत्र पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, तुळजापूर पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांना या प्रकरणाबाबत चौकशी केली असता ते म्हणाले की येत्या दोन-चार दिवसात कसून चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करणार तुळजापूरनामा न्युज शी बोलताना सांगितले.

उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या निलंबनाचे सिंध्दफळ कनेक्शन ? पोलिस प्रशासनाने चौकशी केल्यास असे अनेक प्रकरण उघडकीस येथील हे नक्कीच
शिवसेना नेते अमोल जाधव, तुळजापूर