क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रहार संघटना तुळजापूर यांचा स्तुत्य उपक्रम
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर येथील प्रहार संघटना बच्चू भाऊ कडू यांचे कट्टर समर्थक श्री शशिकांत मुळे यांच्या वतीने तुळजापूर शहरातील दिव्यांग भगीणी शाईन रज्जाक पटेल यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज रोजी व्हीलचेअर देण्यात आली यावेळी उपस्थित तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश ( आण्णा ) क्षिरसागर, श्री अभिजित कुतवळ, श्री आण्णासाहेब कणे तसेच लोकमान्य युवा मंच गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री नंदकुमार हाजगुडे, उपाध्यक्ष श्री राहुल कणे, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते श्री पांडुरंग नाईकवाडी, अभिमान सगट, हिना खान, इर्शाद पटेल जीवन भागवत विश्वास ( काका ) बागल आदी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते