ग्रंथालयातील पुस्तकांचा खजिना जपणं काळाची गरज आहे साहित्यिक प्रा . सौ सपकाळ
भूम : औदुंबर जाधव
प्रत्येक वाचनालयातील पुस्तकांचा खजिना हा विज्ञान युगा पेक्षाही अधिक अनमोल ठेवा आहे , अगोदर पुस्तक नंतर संशोधन , अलीकडील काळात वैज्ञानिक प्रगती झाली परंतु इतिहास समोर ठेवूनच प्रगती झालेली आहे, जो इतिहास घडला , तो लिहिला गेला, तो वाचला पाहिजे यासाठीच वाचन संस्कृती जपली पाहिजे, चळवळ जागृत झाली पाहिजे अशी अपेक्षा कै हनुमंत मुरूमकर सार्वजनिक वाचनालयातील पंधरा दिवस सातत्याने राबवलेल्या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री प्रा. सौ. अलका सपकाळ यांनी बोलताना केली . ग्रंथालय चळवळ वाढीस लागली पाहिजे यासाठी त्याचं प्रबोधन व्हावं म्हणून प्रत्येक वाचनालयाच्या माध्यमातून गेले पंधरा दिवस स्वच्छता मोहीम, ग्रंथालय सजावट, ग्रंथ प्रदर्शन, कथाकथन व वाचन शालेय स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचा समारोप बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा . सौ. अलका सपकाळ, कवीमनाचे पत्रकार शंकर खामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तिंत्रज ता. भूम येथील कै. हनुमंत मुरूमकर सार्वजनिक ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये संपन्न झाला . यावेळी साहित्यिक प्रा सौ. सपकाळ यांनी स्वत: लिहिलेल्या वेगवेगळ्या सहा पुस्तकांचा संच विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी ग्रंथालयाकडे भेट म्हणून सुपूर्द केला . यावेळी ग्रंथालय अध्यक्ष अंगद मुरुमकर, माजी सरपंच प्रकाश साबळे, ग्रंथपाल सुरेखा मुरुमकर, ईडा ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण भोरे, सेवक हनुमंत साबळे यांचेसह विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते .