मस्साजोग व परभणी येथील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भूम
भूम : औदुंबर जाधव
कै. सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ जी सूर्यवंशी यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना मोका लावून त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा व इतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भूम यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, भूम परंडा तालुक्यातील २०२४ च्या अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान मंजूर करावे, शासकीय ऑफिस मधील रिक्त जागेवर कायमस्वरूपी अधिकारी नेमण्यात यावा, शेतकऱ्यांना शेती पंपाला लागणारी वीज ही दिवसा देण्यात यावी, भूम परंडा वाशी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यात यावे, भूम परंडा वाशी तालुक्यातीलपवनचक्क्याच्या मालकाकडून झालेल्या कामाचे रीतसर रॉयल्टी भरून घेण्यात यावी या मागण्याची तात्काळ शासन दरबारी दखल घेण्यात यावी नसता २३ रोजी आपल्या कार्यालयासमोर घंटानाद करून गोलाई चौक भूम येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासनावर राहील असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर शिवसेना उबाठा पक्षाचे युवा धाराशिव जिल्हाप्रमुख चेतन बोराडे, भूम तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, आनंद नलावडे, गहिनीनाथ गटकळ, श्रीमंत डोके, अजय कोकाटे, भाऊसाहेब अंधारे, बालाजी देवरे, पिराजी शेळके, रोहिणी गपाट, लांडे, शंकर कपाट, दिलीप तमांचे, महेंद्र तमांचे, अशोक वनवे, उमा रंधवे, संजय नायकेंदे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.