तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांच्या माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार
तुळजापूर : प्रतिनिधी
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा पत्रकार संघ संलग्न असलेल्या तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर गवळी (लटके ) तसेच तालुकाध्यक्ष प्रदीप अमृतराव,शहराध्यक्ष सचिन ताकमोगे यांची निवड झाल्या बद्दल माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस पार्टी ऑफिसच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार डॉ सतिश महामुनी , अनिल आगलावे ,युवा नेते ऋषिकेश मगर,तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक अमर भैया मगर, सभापती शिवाजी गायकवाड , बबन जाधव इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने होते.
