श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्टचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाकंभरी नवरात्र महोत्सव २०२५ संपन्न होत आहे याचे औचित्य साधून श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या नववर्षाची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा बुधवार दि. ०८ रोजी दु. ०२ वा हॉटेल स्कायलॅन्ड येथे आयोजित केला असून.मा. गुरुवर्य महंत तुकोजी बुवा गुरु बजाजी बुवा व मा. महंत वाकोजी बुवा गुरु तुकोजी बुवा तसेच पत्रकार बंधू यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार असल्याचे माहिती श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल विजयराव रोचकरी यांनी तुळजापूरनामा न्युजशी बोलताना सांगितले.
