रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दि.६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दि.६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारी क्षेत्रात सातत्याने न्याय,निर्भीड, निपक्ष, प्रामाणिक व तटस्थ भूमिका घेऊन निष्ठेने पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार बंधू पत्रकारांचा वारसा सार्थपणे पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तुळजापूर यांच्या वतीने पत्रकार संघाचे नुतन तुळजापूर तालुकाध्यक्ष प्रदीप अमृतराव, जिल्हा उपाध्यक्ष संजय खुरूद, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, नुतन तुळजापूर तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, शहराध्यक्ष सचिन ताकमोगे, शहर उपाध्यक्ष सुरज बागल, जिल्हा कार्यकारी सदस्य सतीश महामुनी, गोविंद खुरुद, रुपेश डोलारे, अनिल आगलावे, कोषाध्यक्ष सोमनाथ शेटे, सचिन ढेले, सिद्धीक पटेल यांचा सत्कार पुष्पगुच्छ,फेटा व पेन देऊन करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा नगरसेवक तानाजी कदम हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे युवक शहराध्यक्ष अमोल कदम हे होते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आप्पा कदम, रवी वाघमारे, निशांत कदम, आतिश कदम, सोनू कदम, महादेव सोनवणे, बाळासाहेब ढवळे, बाळू डावरे, सुरेश चौधरी, गोपाळ सोनवणे, विजय गायकवाड, विकास हावळे, जयदेव कदम, अविनाश भगत, विलास सरवदे,शंकर शिंदे, प्रभाकर गायकवाड,भागवत कदम, आप्पा ज्योती कदम इत्यादीसह कार्यकर्ते उपस्थित होते.