गुढ आवाजाने तुळजापूर तालुका हादरला, नागरीकांमध्ये भितीचे वातावरण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुका परीसर दि. ६ रोजी गुढ आवाजाने हादरला असुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले दिसुन येत आहे. सोमवार सकाळी ठीक ११ वाजुन ५८ मिनिटांनी जमीनीतुन गडगडल्यासारखा आवाज झाला व शटर , पत्रे हादरले अचानक झालेल्या आवाजाने नागरीक भयभीत झाले. नागरीकांनी शेजारच्या गावांमध्ये तसेच इतर नागरीकांना दुरध्वनीवरून संपर्क करुन विचारले असता गुढ आवाज झाल्याचे सांगितले. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असुन भुकंप झाला की काय अशी चर्चा नागरीकांमधुन होऊ लागली आहे. तुळजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्य जमीनीमधुन गडगडल्यासारखा आवाज झाल्याचे नागरीकांनी सांगितले.