महाराष्ट्र पोलीस दल वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा – सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापनदिनाच्या अनुषंगाने पोलिस ठाणे हद्दीतील महिला सुरक्षा संदर्भात तामलवाडी येथील सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे विद्यार्थ्यांसोबत रॅली काढण्यात आली महिलांविष्यीचे कायदे व गुन्हे याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच सरस्वती विद्यालय तामलवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांची पोलीस ठाणेस भेट आयोजित करून त्यांच्याशी सुसंवाद साधला व पोलीस विभागात वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांबाबत माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक देवकर तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


