सेवापुर्ती निमित्त मस्के यांचा सपत्नीक सत्कार
धाराशिव : प्रतिनिधी

धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथील आश्रम शाळेतील ३७ वर्ष सेवेबदल श्रीकिसन मस्के यांचा सेवापुर्ती सपत्नीक सत्कार करण्यात आला. आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिंगोली, धाराशिव, यांच्या तर्फे सपत्नीक संपूर्ण पोशाख व फेटा, शाल, श्रीफळ, हार व पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वरूढ प्रतिमा भेट देवून यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळा, शिंगोली चे मुख्याध्यापक खंडू रंगनाथ पडवळ, नागनाथ पाटील, रत्नाकर पाटील, चंद्रकांत जाधव, सुर्यकांत बडदापुरे, शेषेराव राठोड, दिपक खबोले, सुधीर कांबळे, प्रशांत राठोड, मुख्य लिपीक संजीवकुमार मस्के, शानिमे कैलास, मल्लिनाथ कोणदे , विशाल राठोड, सचीन राठोड, मदनकुमार आमदापुरे, सतीश कुंभार, सुरेखा कांबळे, श्रद्धा सुर्यवंशी, ज्योती साने, ज्योती राठोड, बालिका बोयणे, अधिक्षक वैशाली शितोळे , कर्मचारी लिंगा आडे, गोविंद बनसोडे, रेवा चव्हाण, अविनाश घोडके, सागर सुर्यवंशी व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.