मस्साजोग येथील कै. सरपंच संतोष देशमुख व परभणीतील कै. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करावे : आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांची निवेदनाद्वारे मागणी

मस्साजोग येथील कै. सरपंच संतोष देशमुख व परभणीतील कै. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करावे : आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांची निवेदनाद्वारे मागणी

तुळजापूर : प्रतिनिधी

धाराशिव: बीड जिल्ह्यातील मस्साजोगाई येथील कै. सरपंच संतोष देशमुख व परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करावे यासाठी आम आदमी पार्टी धाराशिव जिल्ह्याचे उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.

या निवेदनात असे नमूद केली आहे की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील कै.सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी विद्यमान आमदार सर्वपक्षीय महाराष्ट्र राज्यातील लोक नेते यांनी बीड येथे मोर्चामध्ये सहभाग घेऊन संतोष देशमुख यांच्या हत्या संदर्भात फरार असलेले आरोपी त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या संबंधित गुन्हेगारावर कठोर कारवाई संबंधित
नेते मंडळी यांच्या पाठबळ असलेल्या नेते मंडळींनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना .बीड परभणी आणि पुणे जिल्हा
मोर्चामध्ये फलक लावून मागणीचे आक्रोश निवेदन देण्यात आले.

वाल्मीक कराड यांना अटक करण्यात
आली आहे व .धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा कै. संतोष देशमुख यांच्या हत्या संदर्भात असलेल्या सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षेची मागणी करण्यात आली आहे. बीडचे कै. संतोष देशमुख व परभणी येथील कै. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनावर आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके, शहराध्यक्ष तुळजापूर किरण यादव यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!