तुळजापूर तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी जाहीर तालुकाअध्यक्ष पदी श्री प्रदिप अमृतराव तर उपाध्यक्ष पदी श्री ज्ञानेश्वर गवळी यांची निवड
तुळजापूर : प्रतिनिधी
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न तुळजापूर तालुका पत्रकार संघाची जम्बो कार्यकारिणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे यांनी जाहीर केली आहे. यामध्ये तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी प्रदिप अमृतराव यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर गवळी, सचिवपदी शुभम कदम तर तुळजापूर शहराध्यक्ष सचीन ताकमोगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

तुळजापूर तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी जाहीर तालुकाअध्यक्ष पदी श्री प्रदिप अमृतराव तर उपाध्यक्ष पदी श्री ज्ञानेश्वर गवळी यांची निवड
उर्वरित कार्यकारणीमध्ये सहसचिवपदी गणेश गायकवाड, तालुका कोषाध्यक्ष सोमनाथ शेटे, तुळजापूर शहर उपाध्यक्ष म्हणून सुरज बागल, शहर सचिव अमीर शेख तर सदस्य म्हणून सिद्दीक पटेल, प्रमोद कावरे, सचिन ठेले, गुरुनाथ बडुरे, अजित चंदनशिवे, सतिश पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा कार्यकारणीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संजय खुरुद तर सदस्य म्हणून जगदीश कुलकर्णी, सतीश महामुनी, गोविंद खुरुद, अनिल आगलावे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तुळजापूर तालुका पत्रकार संघ नेहमीच अग्रेसर असतो. या नुतन कार्यकारणीच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.