कर्नाटक सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दिवसा घरफोड्या करणारे अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दि.29.12.2024 रोजी 03.00 ते 06.00 वा. सु. धाराशिव शहरातील पोलीस ठाणे शहर व आनंदनगर हद्दीतील 02 घराची कडी तोडून दोन अनोळखी चोरांनी आत प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरल्याच्या घटना घडल्या होत्या. सदरबाबत पोलीस ठाणे शहर व आनंदनगर येथे गुन्हे दाखल झाले होते. मा. श्री. संजय जाधव, पोलीस अधीक्षक,धाराशिव यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथक यांना नमुद गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेशित केले. सपोनि सुदर्शन कासार व पथक यांनी तात्काळ सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने काम सुरु केले. त्यांनी घटनास्थळांना भेट देवून तेथुन तांत्रिक विश्लेषणातुन माहिती प्राप्त करण्यास सुरुवात केली. तसेच गोपनीय बातमीदार यांना सदरबाबत माहिती काढण्याबाबत कळविले. दि.02.01.2025 रोजी पथकास गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की,पोलीस स्टेशन आनंदनगर हद्दीतील दिवसा घरफोडीतील संशयीत इसम रामजाने क्षिरसागर रा. वाघोली ता. कळंब हा व त्याचा एक साथीदार हे कळंब येथील शिवाजी चौकात थांबले आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून शोध घेतला असता पथकास मिळालेल्या बातमी प्रमाणे दोन इसम एका मोटार सायकलसह मिळून आले. पथकाने नमुद इसमास ताब्यात घेवून त्यांचे नावे विचारता त्यांनी त्यांची नावे- 1.रामजाने उर्फ राम लक्ष्मण क्षिरसागर, वय 31 वर्षे, रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव, 2.धनंजय उर्फ डीके हरिष काळे, वय 20 वर्षे, रा. गणपती मंदीर शेजारी, काटे चाळ कासारवाडी, पिंप्री चिंचवड पुणे असे सांगीतले पथकाने त्यांचेकडे धाराशिव शहरात झालेल्या दिवसा घरफोड्या बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, तीन चार दिवसा पुर्वी धाराशिव शहरात तीन ठिकाणी, तसेच त्याचे आधीही वाशी भागात दोन ठिकाणी, तामलवाडी, नळदुर्ग भागात एक ठिकाणी व लातुर येथे त्या दोघांनी दोघंनी बंद असलेल्या घरात दिवसा घरफोडी करुन चोऱ्या केल्या आहेत आणि धाराशिव शहरात केलेल्या घरफोडीमधील चोरीचे दागिने त्यांनी रामजाने याचा नातेवाईकाकडे दिली आहेत. असे सांगीतल्याने पथकाने त्या दोघांकडून 59.61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोटरसायकल असा एकुण 3,18,300₹ किंमतीचा माल हस्तगत केला.आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेखाची पाहणी केली असता वर नमुद आरोपींनी धाराशिव जिल्ह्यात 09 दिवसा घरफोडीचे गुन्हे केले असुन लातुर जिल्ह्यात 01 दिवसा घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपींना पुढील कारवाईस्तव मुद्देमालासह पो.स्टे. आनंदनगर यांचे ताब्यात दिले आहे.तसेच नमुद आरोपींनी आतापर्यंत कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील सोलापुर,कोल्हापुर,पुणे,कोकण,परीसरात अनेक दिवसा घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थागुशा चे सपोनि- श्री. सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण,प्रकाश औताडे, फहरान पठाण,जावेद काझी, चालक तानाजी शिंदे यांच्या पथकाने केली आहे.