सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे प्रतीटावर २० लाख रुपये टावर बाधित शेतकऱ्यांना द्यावे – राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यामध्ये पवनचक्कीचे काम वेगात चालु आहे. त्यापैकीच एक रिन्यू कंपनी ही तालुक्यात पवनचक्की मनमानी कारभार करीत उभारणी करीत आहे.जिल्हाधिकारी, तथा अध्यक्ष पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हा स्थरीय सनियंत्रण समिती जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांना दि.०१ जानेवारी २०२५ रोजी रिन्यु ग्रिन एनर्जी सोलुन्शस प्रा. लि. यांच्या टॉवर बाधित शेतकऱ्यावर होणाऱ्या गुडगिरी व दहशतीबाबत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी टावर बधित शेतकऱ्यांसह लेखी निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात असे नूद केले आहे की, तुळजापूर तालुक्यामध्ये पवनचक्कीचे काम वेगात चालु आहे. त्यापैकीच एक रिन्यू कंपनी ही तालुक्यात पवनचक्की उभारणी करत असून, या पवनचक्कीवाल्या कंपन्यांनी काय नंगानाच मांडलाय हे सांगण्यासाठी मुळात अर्ज करावा लागतो हे प्रशासनाचे महापाप आहे. सदर कंपन्या तालुक्यात राजरोसपणे बॉऊसर भाडयाने आनुन भाडोत्री गुंड आणुन सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय चालवलाय दररोज वृत्तमान पत्रात दुसरी बातमी ही पवनचक्की वाल्याच्या काळ्या कारनाम्याची असते प्रशासन नक्की करतय काय. असा भीतीप्रयक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. शेतकरी म्हणजे कुनीही यावे टिकली मारुन जावे त्याप्रमाणे कोणत्याही पवनचक्कीने यावे व शेतकऱ्यांना लुटून जावे असा अतभुतपुर्व प्रसंग बघायला मिळतोय हे दुर्देवी आहे.
सदर पवनचक्की कंपन्या आम्ही अपारंपारिक उर्जा बनवतो म्हणुन राज्य शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतात. त्यात जागतीक बँकेकडुन हजारो कोटीची कर्जे ह्या पवनचक्की कंपन्या सवलतीच्या व्याजावर घेतात. परंतु जेव्हा वीज विकतात तेंव्हा ते विज अधीक दराने विकतात व प्रचंड असा नफा कमवतात परंतु शेतकऱ्याच नुसानभारपाई देताना मनामानी, दादागिरी करुन त्यांचे काम करुन घेतात.
तुळजापूर तालुक्यातील गंधोरा, चिवरी, उमरगा (चिवरी), शिरगापुर, धनगरवाडी, निलेगाव इत्यादी गावामधुन रिन्यु पावर नावाची कंपनी स्वताची वैयक्तीक ट्रान्समीशन टावर लाईन ४०० के. व्ही. हायटेन्शन लाईनच कन्सट्रक्शन करत असून गंधोरा गावात ४०० के. व्ही विद्युत उपकेंद्र पवनचक्की विज एकत्र करण्यासाठी उभारले असून याच सबस्टेशन मधुन विज विकण्याकरीता लिंबे चिंचोळी पवार ग्रीड सबस्टेशन ८६५ / ४०० के व्ही. ला कनेक्ट करत आहेत.
तर यांच्या खाजगी टावर लाईन गावामधुन नेत असताना प्रचंड दादागिरी व अरेरावाची भाषा रिन्यु कंपनी करत आहे. सदरील टावरबाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या निजामी कारवाई विरोधात राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांच्याकडे लिखीत तक्रार केलेली असून यात रिन्यु कंपनी सर्वस्वी दोषी आढळुन येत आहे.
सदरील टावरसंबंधीत शेतकऱ्यांच्या स्टेटमेंटप्रमाणे रिन्यु पवार कंपनीने शेतकऱ्याकडून १०० रुपये च्या मुद्राकावर संमतीपत्र लिहून घेऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला देऊन राजीखुषी काम करणे अपेक्षित असताना सदर बाबीसाठी महाराष्ट्र शासनाचा २०२० चा जी आर आहे. की टावरचे काम करताना शेतकऱ्यांना जमीन नुकसान व पिक नुकसानीची भरपाई कशी करावी याचे सवीस्तर वर्णन या जिआर मध्ये आहे. त्या जी आर प्रमाणे काम करने अपेक्षित असताना कंपनी टावरबाधीत शेतकऱ्यांची तुटपुंजा मोबदला देऊन भयानक थट्टा करत आहे, प्रशासन मात्र केंद्र सरकारच राजपत्र दाखवुन हे पवनचक्कीच काम कस सरकारी आहे हे दाखवून देण्यात व्यस्त आहे. सदरील टावरलाईनचे काम हे शेतकऱ्यांच्या संमती न घेता त्यांना कुणाला ४० हजार, ८ हजार, १ लाख, २ लाख, ३ लाख अशी नुकसानभरपाई देऊन समस्त शेतकऱ्यांचा आपमान करत आहेत. सदरील टावरचे काम करताना कंपनी राजरोसपणे पोलीस संरक्षणाच्या नावाखाली पोलीसांना लॅन्ड डिलींग (तडजोड) करायला लावत आहेत. प्रशासनाच्या आर्शीवादाने हे उघड्या डोळयादेखत घडत आहे, शेतातुन एकदाकाही टावरलाईन गेलीकी ती शेती व्हॉल्युलेस होते त्या शेतीला काहीच महत्व उरत नाही. सदर टावरलाईन शेतातुन गेल्सास त्या जमीनीस एन ए अकृषी कधीच होऊ शकत नाही. त्यात पॉली हाऊस ग्रिन हाऊस, शेततळे, कुकुट पालन, द्राक्ष बाग, विहीर, बोअरवेल यापैकी काहीच करता येत नाही पर्यायाने सदर जमीनीचे शासकिय अस्थित्व संपत जाते. तसेच कोरडभुई जमीनीत टावर गेल्यास त्यास सोलार प्रोजेक्ट करीता भाडयाने देता येत नाही, चोहीबाजुने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान करुन चक्क तिन लाखात शेतकऱ्यांना पोलीसाकडून दमदाटी करुन थंड केले जात आहे.
सदर टावरलाईनचा अन् देशहिताचा संबंध लावला जात आहे, एक गॅझेटचा आधार घेऊन शेतकऱ्याला लुटले जात आहे. रिन्यु कंपनी पवनचक्की टावर टाकुन प्रचंड पैसा मिळविन्याकरीताच काम करत आहे, व आम्ही देशहिताचे काम करत आहोत अशी आवई ठोकत आहे, प्रशासनाने कधीच देशहीताचा व या पवनचक्की कंपन्याचा नसता संबंध जोडू नये कारण सदर कंपन्या ह्या फक्त शासकीय नियमांच राजरोसपणे उल्लंघन करत आहेत व प्रशासन मुग गिळून गप्प का आहेत.
मला राष्ट्रवादी क्रांग्रेस पार्टीच्या तालुक्याअध्यक्ष या नात्याने शेतकऱ्यांची कॅफीयत मांडत यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, सदर रिन्यु पावर कंपनीने केंद्र सरकारचे पारीत झालेल राजपत्र दाखवुन प्रशासनावर पकड निर्माण केली आहे. हे माहित आहे परंतु सदर कंपनी महाराष्ट्र शासनाचा टावरसंबंधीत शेतकरी नुकसान भरपाईपर मार्गेदर्शीका व जि आर च्या नियमाचे दररोच उल्लंघन करत आहे. त्याचा जि आर पत्रासोबत जोडत असून प्रशासनाने जी आर पाळला नाही म्हणुन तात्काळ कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी सदर टावरलाईन मंजुरी ते आत्तापर्यत झालेल्या कामाबाबत चौकशी करावी व प्रत्येक फसवणुकीबाबत कंपनीवर गुन्हे दाखल करावे, शेतकरी आधीच परीस्थितीन खुप गंजुन गेलेला असून त्यात हे पवनचक्की वाले शेतातुन टावर नेन्यासाठी पोलीस बळ वापरत आहेत हे कायद्याच्या विरोधात आहे.
सदरील प्रकारासाठी जि आर प्रमाणे आपल्या जिल्हा प्रशासनाने एक तज्ञ समिती नेमावी टावरलाईनच्या कामासाठी व यांच्या सर्व गैरकारभारची चौकशी करुन दोषीवर कडक कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांची संम्मती न घेता काम केल्याबद्दल प्रशासनाकडुन सदर कंपनीवर जबर कारवाई अपेक्षीत आहे. थोडक्यात सांगायचे तर २० लाख रु. प्रतीटावर शेतकऱ्याची मागणी आहे व तशी सुप्रीम कोर्टाची जजमेंट ऑर्डर अर्जासोबत जोडत आहोत. त्यामुळे प्रशासनाने आमच्या अर्जाची गंभीर्यपूर्वक दखल घेऊन सदर कंपनीबाबत चौकशी समीती नेमावी व कार्यवाही करावी.तसेच शेतकऱ्याकडे पोलिसांनी केलेल्या आन्यायाच्या पोलिस, बॉउंसर यांनी दमबाजी केल्याचे अनेक व्हिडीओज शेतकऱ्याकडे असून मागितल्यास प्रशासनाकडे सादर करुन शकतो, शेवटी प्रशासनाला व रिन्यु कंपनिला एकच विनंती असेल की, सदर टावर बादित शेतकऱ्यांचा विषय येत्या ८ दिवसात मिटवावा अन्यथा खास रिन्यु कंपनीच्या माहितीस्तव आपल्याच देशातील गुजरात राज्यामध्ये १४ टॉवर लाईनचे काम शेतकऱ्यांनी आर ओ डब्लू करुन आडवल्यामुळे व वादळी संघर्ष केल्यामुळे गत १० वर्षापासून गुजरात सरकारच्या स्वताच्या १४ टॉवर लाईनचे काम पुर्णपणे ठप्प आहे. तोच गुजरात पॅटर्ण मला तुळजापूर तालुक्यात राबवायला वेळ लागणार नाही यांची विशेष नोंद रिन्यु कपंनीने घ्यावी व मी स्वता किंवा कुढलाही शेतकरी पवरचक्की टावर किंवा त्यांच्या कामा विरोधात नसुन कंपनीच्या होणाऱ्या अन्याया अत्याचारा विरोधात आहोत, योग्य नुकसान भरपाई द्या आणि काम करा, शेतकरी तुम्हाला कधीही अडवणार नाही हे प्रशासनाने लक्षात घ्यावे प्रत्येक गोष्टी कडे बधुन कार्यवाही करताना झारीतील शुक्राचार्यांची भुमिका अदा करण्याचे काम प्रशासनाने करु नये.
आम्हाला न्याय न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तुळजापूर तालुकाअध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी या नात्याने रिन्यु कंपनीविरोधात व प्रशासनाविरोधात आमचे नेते अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री यांचे कडे तक्रार करण्यात येईल व मा. सुप्रिम कोर्ट दिल्ली यांच्याकडे रिन्यु कंपनी पवनचक्की व टॉवर लाईन विरोधात जनहित याचीका दाखल केली जाईल. यांची सर्वस्व जबाबदारी प्रशासन व रिन्यु कंपनीवर असेल असा एका लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे.
माहितीस्वत
मा. पोलिस महासंचाल संभाजी नगर यांना तसेच,मा. महसुल मंत्रालय सचिव. मुंबई.,मा. ग्रहमंत्रालय सचिव मुंबई,.रिन्यु ग्रिन एनर्जी सोलुन्शस प्रा. लि. यांना माहितीस्वत एक निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.