अकृषी (एन ए )प्रकरणातील अधिकाऱ्यांचे धागेदोरे उघडे पडल्यामुळे लेखणी बंद आंदोलन मागे – शिवसेना नेते अमोल जाधव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
जिल्ह्यातील शासकीय महसूल कर्मचारी यांनी उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या विरोधात लेखणी काम बंद आंदोलन चालू केले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अपंग व शेतकरी गोरगरीब दिन दुबळे वयोवृद्ध महिला इतर नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे तुळजापूर येथील ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ) शिवसैनिक अमोल शिवाजीराव जाधव यांनी हा लेखणी काम बंद आंदोलन मागे घेण्याबाबत राज्याचे -मुख्यमंत्री ,देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री -एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,यांना ईमेलद्वारे लेखणी काम बंद आंदोलन माघार घेण्यासाठीचे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी तातडीने महसूल प्रशासनाचे काम बंद आंदोलनाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना लेखणी बंद आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन मागे घेण्यात आले आणि सर्व कामकाज सुरळीत चालू झाले आहे.

शिवसेना नेते अमोल जाधव यांची प्रतिक्रिया
सदरील अकृषी (एन ए ) प्रकरणात फसवेगिरी ही झालेली असून सर्व काही पुरावे शासकीय कार्यालयांच्या विरोधातच जिल्हाधिकारी यांच्या हाती लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला घाबरून लेखणी बंद आंदोलन मागे घेण्यात आले.सदरील प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांचे काळे कारनामे जनतेच्या समोर उघड झाले.त्यामुळे जनता प्रचंड चिडून आहे.लोकांनी आपले अकृषी (एन ए ) परवाने तपासून खात्री करून घेण्याची गरज आहे.