बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वत:चे गाडीवर हल्ला करण्याचा बनाव.

बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वत:चे गाडीवर हल्ला करण्याचा बनाव.

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील फिर्यादी नामदेव बालीश निकम, वय 38 वर्षे, व्यवसाय गाडी धंदा टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स पुणे ह.मु. जवळगा मेसाई यांनी दिनांक 27.12.2024 रोजी फिर्यादी जबाब दिली की, फिर्यादी व त्यांचा मित्र प्रविण नरहरी इंगळे हे दोघे दि.26.12.2024 रोजी रात्री 10 वाजणेचे सुमारास व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडने त्यांची कार क्र. MH 12 QT 7790 मध्ये जात असताना दोन नेमप्लेट झाकलेल्या मोटारसायकल वरील तोंड झाकलेल्या चार अज्ञात व्यक्तीने मिळून फिर्यादी यांचे गाडीवर दोन्ही बाजूने अंडे, दगड, सिमेंटचा ठोकळा असलेल्या पाईपने मारुन काच फोडली. त्यानंतर गाडीत असणारे फिर्यादी व साक्षीदार प्रविण इंगळे यांचे अंगावरती पेट्रोल भरलेला फुगा फेकुन हल्ला केला आहे. अशा प्रकारची माहिती पोलीसांना कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना होवून घटनासथ्‌ळाची पाहणी केली. नामदेव बालीश निकम यांचे फिर्याद जबाब वरुन अज्ञात चार लोकाविरुध्द पोस्टे तुळजापूर गु.रं.नं.591/2024 कलम 110,324(6),118(1), 126(2),352, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले असता घटनास्थळावरील परिस्थिती आणि फिर्यादी यांनी सागिंतलेली घटना यामध्ये विसंगती दिसुन येत होती. सदर गुन्ह्याचा तांत्रीक पध्दतीने तपास करुन यातील फिर्यादी नामदेव निकम व साक्षीदार प्रविण इंगळे या दोघांना विश्वासात घेवून अधिक तपास केला असता फिर्यादी व साक्षीदार यांनी सदरची घटना ही फिर्यादी यांना बंदुकीचे लायसन्स काढणेसाठी स्वत:वर इतर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी स्वत:ला बंदुकीचे लायसन्स मिळविणे करीता स्वत:व साक्षीदार यांचेवर पेट्रोल टाकुन, गाडीचे काच फोडून हल्ला केल्याचे कृत्य हे फिर्यादीने स्वत:च करुन हल्ला केल्याचा बनाव केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे व स्थानिक गुन्हे शाखेची टिम, पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, सपोनि भालेराव, सपोनि विठ्ठल चासकर यांनी केलेला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेवून केले उघड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!