श्री क्षेत्र आलम प्रभू विश्वस्त मंडळ व अन्नछत्र विभागाच्या वतीने आरती व महाप्रसाद संपन्न
भूम:: औदुंबर जाधव
मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस दर्श अमावास्या या महीण्यामधे दि. ३० डिसेंबर रोजी श्री क्षेत्र आलमप्रभू या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचे पवित्र ठाण असून मार्गशीर्ष महीण्यामधे श्री दत्तात्रेयांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यानंतर तीन दिवसांची यात्राही भरते त्यामुळे हा महीना भुम शहर व तालुक्यात अतीशय पवित्र मानला जातो.या महीण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दर्श अमावास्येला महाआरती व महाप्रसादाचे आयोजन श्री क्षेत्र आलमप्रभू विश्वस्त मंडळ, श्री क्षेत्र आलमप्रभू अन्नछत्र विभाग तसेच समस्त गावकरी मंडळींकडून आयोजित केले जाते.श्री क्षेत्र आलमप्रभू अन्नछत्र विभागाकडून वर्षभर गावकरी व श्रध्दाळू यांच्या वतीने दररोज दुपारी 12.00 च्या आरती नंतर प्रसादाचे आयोजन केले जाते.तसेच भुम शहरातील व्यापारी वर्गाकडे देवस्थानचे गल्ले दिले जातात ते वर्षा अखेरीस गोळा करून विश्वस्त मंडळ गावकरी व जमा झालेला निधी मिळून समस्त भुम शहर व तालुक्यातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
