तुळजापूर तालुक्यातील जनतेला पोलीस प्रशासनाचे आवाहनभुरट्या चोरांपासून सावध – पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर
तुळजापूर, : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा सण म्हणजे वेळ अमावस्या ही आज दि.३० रोजी सोमवारी साजरी होत आहे. तेव्हा ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांना , शेतकरी पूजा व वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी मित्र परिवारासह सहकुटुंब शेतात जात असतात. या वेळी गावात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत भुरटे चोर चोऱ्या करण्याची दाट शक्यता असते त्यामुळे तुळजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने आपणास जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम सुरक्षित ठेवावे, घरात मोठ्या रकमा पैसे किंवा दागिने ठेवू नयेत शेताला जाताना घरात, आपल्या परिसरात किमान एखादा तरी जागरूक व्यक्ती ठेवावा. घराची दारे, खिडक्या बंद असल्याची खात्री करून घ्यावी. सीसी टिव्ही असतील तर डि व्हि आर सापडणार नाही अशा जागी ठेवावा आपल्या घराची व दागदागिन्याची काळजी आपणच घ्यावी.गल्लीत अगर परिसरात एखादा संशयित इसम इतरत्र भटकत आल्यास पोलीस प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांनी केले आहे.