भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या आंदोलनाचा जाहीर निषेध भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा भडगा उघारणाऱ्या उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढव्हळे यांना जाहीर पाठिंबा – शिवसेना नेते अमोल जाधव
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील धाराशिव तालुक्यातील महसूल मधील भ्रष्टाचाराची चौकशी चालू केल्याने भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या आंदोलनाच्या विरोधात शिवसैनिक अमोल जाधव यांनी तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला आहे. उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांनी तुळजापूर उस्मानाबाद तालुक्यातील बोगस एन. ए. लेआउट बोगस इम्युनिटी झोन बोगस ओपन पेस करणे बोगस ग्रीण झोनचा एन ए करणे बोगस वर्ग दोनच्या जमिनीचा एन ए करणे गौण खनिजचा नियमांचा उल्लंघन करणे, आदि भ्रष्टाचाराची चौकशी चालू केल्यामुळे भ्रष्ट अधिकारी यांचे धाबे दणाणले असून उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्यावर बिन बुडाचे आरोप करत धाराशिव तहसिल तुळजापूर तहसिल कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनाचा जाहीर निषेध करून भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.