नवीन वर्ष नवीन संकल्प– नवीन वर्षात पाऊल ठेवताना-
तुळजापूर : प्रतिनिधी
मित्रांनो,जुने वर्ष बघता बघता संपत आले आणि संपले ही! आता नवीन वर्ष सुरुवात होत आहे. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखी, समाधानी, आनंददायी जावो व सर्व वाचकांचे आरोग्य सुदृढ राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! नवीन वर्ष म्हटलं की आपला उत्साह वाढतो. नवीन वर्षात काही तरी नवीन संकल्पना कराव्यात. नवीन वर्षाचा नवीन सूर्योदय, नवीन प्रकाश किरणे, आपल्याला प्रेरणा देतात. आपला उत्साह वाढवतात. नवीन निसर्ग व निसर्गातील सर्व घटक नव्या रूपाने आपल्यासमोर येतात. जुन्या पिढीने नवीन पिढीला काय दिले याचाही विचार करणे गरजेचे आहे अमूल्य संस्कार नैतिक मूल्य उच्च शिक्षण व्यवहार कुशलता स्वावलंबी जीवन जगण्याची कला जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन घटनांच्या मधला काळ होय. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण जो काळ अनुभवतो, उपभोगत, त्यालाच जीवन असे म्हणतात. मग जीवन जगत असताना ज्या मूलभूत बाबी घटक आपल्याला आवश्यक असतात ती सगळी आपल्याला निसर्ग मधून मिळतात. म्हणून निसर्गाप्रती आपल्याला कृतज्ञ राहिले पाहिजे. दिवसा मागून दिवस जातात, महिने निघून जातात, वर्ष निघून जातात, आपण मात्र आपल्या कार्यामध्ये रमून जात असतो. आपल्या आयुष्याची वजाबाकी होत असते! जुन्या वर्षांनी आपल्याला काय दिले? आणि नवीन वर्ष आपल्याला काय देईल? याची उत्सुकता लागून राहिलेली असते! जुन्या वर्षांनी आपल्याला खूप अनुभव दिले. वेगवेगळे मार्ग दाखवले. वाट दाखवले आणि आपण त्या वाटेने चालू लागलो. जीवन जगण्याची धडपड पाहिले, जगले पाहिजे, निसर्गाच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. परंतु ज्यांनी आपण सर्वजण कितीतरी नशीबवान आहोत आज नवीन वर्षाचे स्वागत करीत आहोत!! याप्रसंगी देवा, सर्वांना सुखी ठेव व सर्वांच भलकर हीच एकमेव अपेक्षा आपण करूया. कुणीतरी म्हटलेलं आहे, “कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल” बऱ्याच लोकांना वाईट व्यसन करण्याची वाईट सवय लागलेली आहे! वाईट व्यसन सोडा, मद्यपान करून गाडी चालवू नका, दारूच्या व्यसनाने दरवर्षी दीड लाख लोक आपला जीव गमावतात अशी माहिती समोर येते!! आपण विचार केला तर एखाद्या आजाराप्रमाणे मृत्यूची संख्या आहे ही. येणाऱ्या नवीन वर्षात कुठलीही वाईट व्यसन करणार नाही असा संकल्प करा. आपण आणि आपले आरोग्य सांभाळा. आरोग्य ” आरोग्य ही संपत्ती आहे,” आरोग्य सांभाळण्यासाठी चांगला आहार, विहार, व्यायाम, खेळ, योगा, चांगले विचार, चांगले कार्य, दुर्गुणापासून सावध राहा!! दुर्गुण हे आपल्याला फसवतात. फसवण्यासाठी असतात. त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. आपली भाषा चांगली ठेवा, समोरील व्यक्तीला चांगले बोला, स्वाभिमान बाळगून अभिमान दूर करा. मनमिळाऊ व विनम्र स्वभाव ठेवाल तर आपले सर्वजण मित्र बनतील! सर्वांच्या मदतीला धावा, सर्वजण तुमच्या मदतीला धावतील! निसर्गाचा एक सरळ नियम आहे, “क्रिया तशी प्रतिक्रिया” तंबाखू, दारू, गांजा, आफु या सोबतच. तरुण व नवयुवकांसाठी सतत चोविस तास मोबाईल बघणे व त्यातील गेम खेळत राहणे म्हणजे युवाशक्तीची प्रगती नव्हे!! मोबाईल हा आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठीच आहे. आपला मित्र आहे. पण त्याचा उपयोग चांगल्या कार्यासाठीच केला पाहिजे. मोबाईल वरून इंटरनेट वरून आपल्याला संपूर्ण जगाचे ज्ञान, माहिती एका क्लिकवरून कळते आहे ही आपली फार मोठी प्रगती आहे. नवीन वर्षात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा चांगला प्रयोग केला पाहिजे. जीवन जगण्यासाठी समाधान ही अंतकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे. जीवन खूप सुंदर आहे ते सुंदर पद्धतीने जगता आले पाहिजे आपल्या अंगभूत असलेला कला कौशल्याची देण याचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग केला पाहिजे देवाने आपल्याला काहीतरी गुण देऊन या पृथ्वीतलावर पाठवले आहे आपल्याला समाधानी राहता आले पाहिजे. जेवढे काही मिळाले आहे त्यात समाधानी राहणे ही एक कला आहे. काटकसर करणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. खरं तर जीवन जगणे ही एक कलाच आहे. प्रत्येकाचे जीवन वेगवेगळे असते. जीवनातील सत्य जाणून सत्य मार्गावर सतत चालत राहणे हे प्रगतीसाठी खूप चांगले आहे. नवीन वर्षात पाऊल ठेवताना विचार करा की, मागील वर्षभरात आपण काय काय केलंय, त्याचा लेखाजोखा करा त्यातून काय अनुभव आला त्या अनुभवातून आपण काय शिकलो? आपल्याला काय संकल्प करता येईल आपल्याला काय दूर करता येईल, काय जवळ करता येईल. घेतलेल्या अनुभवाची शिदोरी आपल्या पुढील पिढीला वाटप करावयाची आहे. व नवीन वर्षाचे स्वागत करावयाचे आहे. खरं तर हा इंग्रजी महिन्याबरोबरच नवीन वर्ष आहे. आता आपणा सर्वांना जगाप्रमाणे पाऊल टाकावे लागते. मग ते शिक्षण असो, व्यवसाय असो, नोकरी असो, कुठलेही क्षेत्र असो अपडेट राहणे ही काळाची गरज आहे! काळा सोबत चालावे लागेल. भविष्य काळातील आपले नियोजन आपल्याजवळ तयार असले पाहिजे. मग ते घर परिवाराबद्दलचे असो, शिक्षणाबद्दलचे असो, नोकरी बद्दलचे असो की, आर्थिक नियोजन असो. यशस्वी जीवनासाठी भविष्यकाळातील अभ्यास व नियोजन वर्तमान काळात करणे व आपले जीवन आनंदी करणे हे आपल्याच हाती आहे.
देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल तुळजापूर जिल्हा धाराशिव