गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचा धाराशिव जिल्हा शिवसेनेच्यावतीने मुंबईत झाला सत्कार
मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे महसुल,ग्रामविकास आणि पंचायती राज्य,अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन शहर तसेच गृहराज्यमंत्री मा.ना. योगेशदादा कदम यांचा मुंबईतील मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरशेजारी असलेल्या त्यांच्या कार्यालयात शिवसेनेचे धाराशिव जिल्हासहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम,यांनी दि.२८/१२/२०२४ रोजी दुपारी १ वाजता देविची प्रतिमा देवून त्यांचा सत्कार केला. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पक्ष वाढीबाबत तसेच जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडे झालेले दुर्लक्ष दुर करून सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, नासिकचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गणेशजी कदम,पुण्याचे उद्योजक माऊलीशेठ कदम,दौंड तालुक्यातील गलांडवाडीचे सरपंच गजानन कदम,पंढरपूरचे सागर कदम,
माणगाव जि.रायगड येथील रामजी कदम,
दत्ताभाऊ कदम,अक्षय कदम आदी हजर होते.


