भुम तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हाडोंग्री येथे बाल आनंद मेळावा
भूम : औदुंबर जाधव
तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे बाल आनंद मेळावा अंतर्गत आंनदी बाजार जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य मुक्तप्पा तळेकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष काशिनाथ जावळे भगवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल डोके यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक सचिन गोवर्धन, उपसरपंच रविंद्र लोमटे आर बी भोजने,राख पी एस,काशिद एस जी अमृता क्षीरसागर विक्रम जावळे सुधीर क्षीरसागर गूरूलिंग साखरे प्रशांत कदम नागेश साखरे उपस्थित होते.पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते यामध्ये फळ भाजी भजे वडापाव भेळ बॅगल्स शेव चिवडा असे विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते.गावकऱ्यांनी आंनदी बाजार मेळाव्याला मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन विद्यार्थी कडील वस्तूची खरेदी केली.यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले