भुरट्या चोरट्यांचे सत्र सुरूच;अनसुर्डा येथील माने कुटुंबाच्या घरातील पन्नास हजार किमतीचे मल लंपास
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
बेंबळी पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी नानासाहेब प्रभाकर माने, वय ३४ वर्षे, रा.अनसुर्डा ता.जि. धाराशिव हे व त्यांचे कुटूंबासह घराला आतून कुलूप लावून झोपले असता अज्ञात व्यक्तीने दि.22.12.2024 रोजी 02.00 ते 02.15 वा. सु. कुलूप तोडून आत प्रवेश करुन घरातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 4,000, दोन मोबाईल फोन, एक घड्याळ असा एकुण 50,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नानासाहेब माने यांनी दि.27.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4),305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.