धाराशिवच्या ‘आक्का’ निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या भ्रष्टाचाराची खुली चौकशी करा
तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करा – अमोल जाधव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिवच्या ‘आक्का’ निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या भ्रष्टाचाराची खुली चौकशी करण्यात यावी व तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन दि.२७ डिसेंबर रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,मा. मुख्य सचिव सुजाता सैनिक,मा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला,मा. महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संजीव कुमार सिंगल,मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर गावडे,मा. जिल्हाधिकारी धाराशिव मैनक घोष यांना सामाजिक कार्यकर्ते शिवसेना नेते अमोल जाधव यांनी दिले आहे. या निवेदनात असे नमूद केले आहे की, • बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्की च्या अर्थकारणातून हत्या झाल्याने पूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. तसाच काहीसा प्रकार धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे. • धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावातील सरपंचाचे वाहन पवन चक्की च्या ठेकेदार आणि गुंडांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. • बीड जिल्ह्यामध्ये सर्व घटनांचा सूत्रधार हा कोणी “आक्का” आहे मात्र धाराशिव मध्ये आमची ‘आक्का’ म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हीच मुख्य सूत्रधार आहे. • धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या 11 कंपन्या कार्यरत आहेत. त्या कंपन्याचे अधिकारी हे डायरेक्ट धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना हप्ता देतात असे आरोप आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमोल जाधव यांनी केले आहे. • पवनचक्की उभी करताना शेतजमिनीचा औद्योगिक अकृषक परवाना लागतो. तो परवाना देताना निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव ह्या सर्व नियम धाब्यावर बसवून लाखोंची लाच घेऊन नियमबाह्य परवाना देतात. • जिल्ह्यात पवनचक्की चे ठेकेदार मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन करतात. अशावेळी एखादा अधिकारी गौणखनिजावर कारवाई करायला गेल्यास त्याला निवासी उपजिल्हाधिकारी बोलून घेतात आणि त्याला समजावून सांगतात की, हा शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. हे नियमित जिल्हाधिकारी कार्यालयाला गौण खनिजचा पैसा भरत असतात. त्यामुळे पवन चक्की वाल्यांवर कारवाई करून त्यांना त्रास देऊ नका. अन्यथा मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. अशा स्वरूपाच्या गुंडांना लाजवेल असे धमक्या देत असतात. • शोभा जाधव ह्या जिल्ह्याच्या अप्पर जिल्हा दंडाधिकारी या नात्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन वर नियंत्रण मिळवून आहेत. कुठेही कुठल्याही कंपनी किंवा कंपनीचा ठेकेदारांना काहीही अडचण आल्यास निवासी उपजिल्हाधिकारी ह्या डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याला बोलवून कंपनी वाल्यांना मदत करण्याचे आदेश देतात. • त्यामुळे कंपनीचे ठेकेदार आणि त्यांनी पोसलेल्या गुंडांना प्रशासनातील एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्यामुळे ते शेतकऱ्यांना पिळू पिळू घेत आहेत आणि जो कोणी त्यांच्या विरोधात आवाज उठवेल त्याला सिनेमाला लाजवेल अशा स्टाईलने दहा दहा काळ्या स्कॉर्पिओ मध्ये येऊन धमक्या देऊन मारण्याचे काम सुरू आहे. • या शोभा जाधव यापूर्वी बीडमध्ये अंबाजोगाई येथे उपविभागीय अधिकारी होत्या. तेथे त्यांनी तलाठ्यांची एक कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेमध्ये तलाठ्यांनी लाज कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिल ते महाराष्ट्रभर गाजलं होतं. • तसेच त्या कळंब येथे तहसीलदार असताना गोरगरिबांच्या अन्नात त्यांनी माती कालावली होती. त्यांनी गोरगरिबांची तांदूळ गहू यामध्ये घोटाळा केला होता. त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. • उमरगा येथे असताना त्यांनी शासकीय जमीन खाजगी व्यक्तीला विकली होती. त्यामध्ये त्या निलंबित सुद्धा झाल्या होत्या. • लातूर येथे असताना त्यांच्या संपत्तीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुद्धा सुरू आहे. • बीडमध्ये असताना निवडणूकीच्या कामात भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांची निवडणुकीची विभागीय चौकशी सुद्धा सुरू आहे. तरीसुद्धा धाराशिव चे जिल्हाधिकारी सचिन ओम्बसे यांनी निवडणूक आयोगाला ना हरकत प्रमाणपत्र देऊन अशा भ्रष्ट मॅडमला आरडीसी बनवलं. • धाराशिव येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून आल्यापासून त्यांनी करोडोची माया जमा केली. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, तलाठ्यांच्या बदल्यां प्रतिनियुक्त यामध्ये 25 हजारापासून 1 लाख रुपयापर्यंत चा रेट आहे. • फटाका परवाना पन्नास हजार रुपये घेतल्याशिवाय देत यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. • बंदुकीचे लायसन देताना सुद्धा प्रत्येक फाईल मध्ये एक लाख रुपये घेतल्याशिवाय फाईल मंजूर झाल्यावर सुद्धा ऑनलाईन करत नाहीत. • निवासी उपजिल्हाधिकारी या पदाला वाहन देय नसताना सुद्धा गौण खनिज मधून खाजगी गाडी लावून त्याच गाडीने धाराशिव येथून सोलापूर आणि लातूर या त्यांच्या स्वतःच्या घरी जातात.असे असंख्य भ्रष्टाचार करण्याचे नवनवीन स्रोत त्यांनी शोधले आहेत.धाराशिव चा ‘बीड’ होऊ नये यासाठी धाराशिव जिल्ह्याच्या ‘आक्का’ असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांनी गैरमार्गाने जमा केलेल्या संपत्तीची चौकशी व फौजदारी गुन्हा दाखल करून खुली चौकशी करावी. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा एका लेकी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना नेते अमोल जाधव यांचे स्वाक्षरी आहे.
