मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले
तुळजापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दि.२७ डिसेंबर रोजी तुळजापूर येथे भेट देऊन सहकुटुंब आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तत्पूर्वी तुळजापूर नगरीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत त्यांचे स्वागत करण्यात आले. मंदिर समितीच्या वतीने तुळजाभवानी मातेची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार अभिमन्यू पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आई तुळजाभवानी माता रविंद्र चव्हाण यांची व कुटुंबीयांची मनोकामना पूर्ण करो, आई तुळजाभवानी मातेस साकडे घालण्यात आले.

