तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा सरपंच नामदेव निकम यांना सिनेस्टाईल पाठलाग करून सरपंचाला पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यात पवनचक्क्यांची दादागिरी वाढल्यामुळे लोक हैराण झाले आहेत शेतकऱ्यांना त्यांचा त्रास होत आहे परिणामी तालुक्यातील एका सरपंचाला गाडीसह पेट्रॅल टाकून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे.तुळजापूर तालुक्यामध्ये देखील पवनचक्क्याच्या दादागिरी चा अनुभव आलेला असून मेसाई जवळगा या गावचे सरपंच यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार नामदेव निकम हे मेसाई जवळगा या गावचे सरपंच असून या मार्गावर ते गाडी चालवत असताना मध्यरात्री अचानकपणे त्यांच्या गाडीवर दोन्ही बाजूंनी मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात तरुणांनी हॉर्न वाजवत गोंधळ घातला. यामध्ये त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि त्यानंतर पेट्रोलचे फुगे गाडीमध्ये टाकण्यात आले. अशा प्रकार झाल्यानंतर नामदेव निकम यांनी गाडीचा वेग वाढवला त्यानंतर मोटारसायकल वरील या गुंडांनी काचावर अंडी फेकले दरम्यान त्यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार पवनचक्की प्रकरणावरून झाल्याची चर्चा असून सकाळपासून या परिसरामध्ये दहशतीचे वातावरण आहे याप्रकरणी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा परिषद प्रमुख आणि संबंधित तपास अधिकारी काय कार्यवाही करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

