जय हिंद विद्यालयाच्या सहल बसला अपघात
चालकाच्या प्रसंगावधाने 40 विद्यार्थी बचावले..
देवगड : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील जय हिंद विद्यालयाच्या शैक्षणिक सहल एसटी बसला रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील खाक्षी घाट परिसरातील तीव्र वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. सदर बस चालकाच्या प्रसंगावधातेने 40 विद्यार्थी मृत्यूच्या दाढेतून बचावल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात स्थानिक माध्यम कर्मी,यासीन पटेल यांनी दिलेली माहिती अशी की,कोकणात शालेय सहलीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. देवगड हुन कुणकेश्वर कडे जाणारी धाराशीव तालुक्यातील तडवळे (कसबे) येथील जयहिंद विद्यालयाची शैक्षणिक सहलीच्या एसटी बसला खाक्षी घाट परिसरातील तीव्र वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. एसटी बस चालकाच्या प्रसंगावधातेने नजीकच्या देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या पाईप लाईनला धडकली व भेंडले माडावर जाऊन नजीकच्या झाळीत अडकली गाडीत सुमारे ४० विद्यार्थी होते.
सुदैवाने गाडीतील 04 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली या अपघातात एसटी गाडीचे आणि तेथील देवगड नळपाणी पाईप लाईन फुटल्याने देवगड जामसंडे पाणी पुरवठा खंडित झाला. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थ विनोद पेडणेकर उदय परब,महेश कोयघाडी,दर्शन नवलू ,समीर लाड यांनी धाव घेतली व अन्य वाहनांना सूचना करून सहकार्य केले.
अपघातात किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्याना देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील प्रवासास निघाले घटनास्थळी स्थानिक स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर हेड मकेनिक ब्रम्हदेव चव्हाण पोलीस हवालदार आशिष कदम यांनी धाव घेतली.धाराशिव विद्यालयाची शैक्षणिक सहल लांजा येथून देवगड कडे आली होती.त्यानंतर कुणकेश्वर मार्गे मालवण कडे जात असताना जामसंडे साक्षी या मार्गावरून कुणकेश्वर कडे जात असताना खाक्षी घाटी मध्ये एसटी चे बस निकामी झाल्याचे चालकाचे लक्षात येताच त्याने मोठ्याने ओरडून गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे सांगितले व विद्यार्थी शिक्षक याना सावध केले.
गाडी नजीकच्या देवगड नळपाणी योजनेच्या पाईप लाईन ला धडकून भेंडले माङला झाळीत अडकली.व सुदैवाने मोठा अनर्थ टळला .या अपघातात पृथ्वीराज अमोल धाबेकर,(१४)गणेश सिद्धेस्वर भडके,(१५)श्रीकृष्ण शीवाजी करंजकर (१४)संकेत सुखदेव सुकांडे (१६),प्रतिक,दत्तात्रय शिंदे (१६),याचा समावेश आहे.दरम्यान पुढील प्रवासाकरीता देवगड आगाराने पर्यायी गाडी,व चालक उपलब्ध करून दिला.